सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यात २२ जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:02 AM2018-04-11T00:02:58+5:302018-04-11T00:02:58+5:30
आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून वर्धा मंडप बिछायत, इलेक्ट्रीक डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, कॅटरर्स, मंगल कार्यालय व लॉन असोसिएशन समितीच्या वतीने जुने आरटीओ मैदान येथे सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून वर्धा मंडप बिछायत, इलेक्ट्रीक डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, कॅटरर्स, मंगल कार्यालय व लॉन असोसिएशन समितीच्या वतीने जुने आरटीओ मैदान येथे सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. यात तब्बल २२ जोडपी विवाहबद्ध झालीत.
सोहळ्यापूर्वी दुपारी ४ वाजता संपूर्ण नवरदेवांची वरात बच्छराज धर्मशाळा शास्त्री चौक येथून बग्गी, घोडे व बँड पथकासह आकर्षक तथा शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली. ही वरात शहराच्या मुख्य मार्गाने फिरून सायंकाळी ६.४५ वाजता मंडपात पोहोचली. गेटवर सर्व नवरदेवांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. सोहळ्याला अतिथी म्हणून मानव सेवा संस्थान परतवाडाचे अध्यक्ष संत नानाजी महाराज तसेच खा. रामदास तडस, आ. अमर काळे, डॉ. सचिन पावडे, नगराध्यक्ष अतुल तराळे, नगरसेवक प्रदीप जग्याशी, श्रेया देशमुख, प्रदीप ठाकरे, प्रवीण धोपटे, महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य के.पी. बर्धिया, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सुधीर भोसले, प्राथमिक शिक्षण समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे, दामोधर राऊत, प्रशांत पिंजरकर, श्रीकांत राठी, प्रशांत कोल्हे, मोहन मिसाळ, सुनील भोवरे, विजू ठाकरे उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन व त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष शिवा तरोडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संचालन संस्थेचे सहसचिव संजय ठाकरे यांनी केले.
सोहळ्यात प्रथम सात जोडप्यांचा बौद्ध धर्मानुसार भंते राजरत्न यांच्या हस्ते लग्नविधी पार पडला. हिंदू पद्धतीनुसार प्रदीप विंजे महाराज यांनी हिंदू विधीनुसार मंगलाष्टकासह विधी पार पाडला. यानंतर वर-वधू यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली. समितीद्वारे त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. अशोक कठाणे यांनी १ ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र, गुलाब शेंडे यांनी मुला-मुलीचे कपडे केले तर राजेंद्र राजुरकर, सुनील पटेल, बाबाराव काळे, सुरेश नाथानी, पवन बलवाणी, दिलीप भातकुलकर, सुनील गुजर, नितीन शिंदे, विक्की पाटील, रवी वघळे, गणेश तोडे, सुनीता जुमडे, मनोज कत्रोजवार, हुसेन भाई, नंदू अनवाणी, रोशन पटेल, राजा पुरोहित, अतुल तराळे आदींनी भेटवस्तू दिल्या. आभार माधुरी राठी, शीतल लाजुरकर यांनी मानले.
सोहळ्याला कुलदीप तराळे, राहुल जैस्वाल, संदीप तराळे, रमेश तानेवाल, परेश देशमुख, सतीश देशमुख, सचिन मसराम, श्रीकांत राठी, मोहन मिसाळ, प्रशांत कोल्हे, सुनील भोवरे, संजय ठाकरे, विजू ठाकरे, राजेंद्र राजुरकर, सुरेश नाथानी, दिलीप भातकुलकर, विनोद भोरे, नितीन शिंदे, हुसेन भाई, आंनद राठी, कवडू कठाणे, महेंद्रा चांदुरकर, नंदू भुतडा, मंगेश अमदुरकर, देवनाथ बाहेकर, संदीप वांदिले, महेंद्र मेश्राम, रवी नगराळे, प्रशांत सहारे, नाना आटे, इंद्रपाल जोगे, फिरोज खान, आकाश भोवरे, राजेश मौर्या, राहुल रामटेके, अक्षय जामुनकर, विकास ठाकरे, टेकाम यासह समिती कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
मॅमोग्राफी तपासणी शिबिर
शनिवारी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यापूर्वी ५ व ६ एप्रिल रोजी मेमोग्राफी तपासणी शिबिर पार पडली. शिबिराकरिता रोटरी क्लब गांधी सिटी व आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी (मेघे) यांचे सहकार्य लाभले. यात महिलांची तपासणी करून सल्ला देण्यात आला.