२२ कुटुंबीयांचा निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:38 PM2018-10-27T22:38:44+5:302018-10-27T22:39:27+5:30
राष्ट्रीय महामार्गामुळे नजीकच्या सेलसूरा येथील २२ कुटुंबियांचा निवाºयाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. सदर कुटुंबीयांचे पक्के घर बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गात गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असून या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रीय महामार्गामुळे नजीकच्या सेलसूरा येथील २२ कुटुंबियांचा निवाºयाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. सदर कुटुंबीयांचे पक्के घर बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गात गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असून या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
बुटीबोरी ते तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी सेलसुरा येथील २२ घरांची जमीन संपादीत करण्यात आली आहे. संबंधीत शासकीय यंत्रणेद्वारे या घरांचे मुल्यांकन करून मोबदलाही देण्यात आला आहे. परंतु, देण्यात आलेला मोबदला अतिशय अल्प असून नवीन घर बांधण्यासाठी सध्या जागाच उपलब्ध होत नसल्याने निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रा.पं. प्रशासनाने सर्व्हे क्र. ४३ मध्ये एकूण ८४ भुखंड पाडले आहे. त्यापैकी ४० प्लॉटचा वाटप ग्रा.पं. प्रशासनाने केला आहे. परंतु, ४२ प्लॉट पैकी काही प्लॉटवर अतिक्रमण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले नाही त्या ठिकाणी आम्हाला जागा देत घर बांधण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर ललिता कांबळे, हरिदास चुरागळे, भगवान गवळी, अमोल केरोदे, नारायण मरापे, लिला कांबळे, गजानन प्रधान, संजय तागडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.