२२ हजार लिटर दुधाची निर्यात

By admin | Published: September 7, 2015 01:59 AM2015-09-07T01:59:45+5:302015-09-07T01:59:45+5:30

जिल्ह्यात कच्चा दुधाचे दिवसाला ५४ हजार लिटरच्या घरात संकलन होते. प्रत्यक्षात जिल्ह्यात दुधाची दिवसाला असलेली मागणी ३२ हजार लिटर आहे.

22 thousand liters of milk export | २२ हजार लिटर दुधाची निर्यात

२२ हजार लिटर दुधाची निर्यात

Next

दिवसाला ५४ हजार लिटर उत्पादन : जिल्ह्यात वाहते दूधगंगा
श्रेया केने  वर्धा
जिल्ह्यात कच्चा दुधाचे दिवसाला ५४ हजार लिटरच्या घरात संकलन होते. प्रत्यक्षात जिल्ह्यात दुधाची दिवसाला असलेली मागणी ३२ हजार लिटर आहे. त्यामुळे उर्वरित २२ हजार लिटरची परजिल्ह्यात निर्यात केली जात आहे. दुधाचे विक्रमी उत्पन्न होत असताना दुधावर प्रक्रिया करून त्यापासून पदार्थ निर्मिती उद्योगाची मात्र येथे वाणवा आहे. त्यामुळे जिल्ह्यातून निर्यात होत असलेल्या दुधावर प्रक्रिया करून निर्मित उत्पादनाची येथे आवक होत आहे.
वर्धा तालुक्यापर्यंत मर्यादित असलेल्या गोरस भंडार संस्थेच्या माध्यमातून दुधाचे संकलन व दुग्ध उत्पादनाची निर्मिती होते. मात्र जिल्ह्यात अन्यत्र याप्रकारे दुग्ध उत्पादन होत नसल्याचे दिसते. याशिवाय जिल्ह्यात ग्रामीण भागात स्थापन केलेले दुग्ध संकलन केंद्र प्रशासकीय उदासिनतेमुळे बंद झाले आहे. तर मोजकेच केंद्र यात तग धरून आहे. त्यामुळे दुधाचे विक्रमी उत्पन्न होवूनही त्याचा उपयुक्त वापर करण्यासाठी येथे यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे दिसून येते. अशी यंत्रणा उभारण्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल. तसेच पशुधन विक्रीला काढण्याची वेळ गोपालकांवर येणार नाही.
जिल्ह्यात शासकीय, खासगी, सहकारी संस्थांकडून दिवसाला ५४ हजार लिटर दुधाचे संकलन होते. ३४ हजार लिटर दुधाची मागणी असून उर्वरित २२ हजार लिटर दूध नागपूर, अमरावती जिल्ह्यात निर्यात केले जाते. दूध संकलन करणाऱ्या १०८ संस्था येथे आहेत. याशिवाय नोंद नसलेल्या दूध संकलन केंद्रावरही २० ते २५ हजार लिटरच्या जवळपास कच्चे दूध संकलित होते. जिल्ह्यात दुधाळू जनावरांची संख्या १ लाख ३० हजाराच्या घरात आहे.
१.३० लाख दुधाळू जनावरे
जिल्ह्यात १ लाख ३० हजाराच्या जवळपास दुधाळू जनावरांची संख्या आहे. तसेच ५४ हजार लिटर दिवसाला दुधाचे उत्पन्न होते. प्रत्यक्षात जिल्ह्यात संकलनापेक्षा कमी मागणी आहे. त्यामुळे उर्वरित दुधाची जिल्ह्याबाहेर निर्यात केली जाते. या निर्यात केलेल्या दुधावर प्रक्रिया करून खवा, पनीर असे विविध उत्पादन तयार करून जिल्ह्यात आयात होते.
दूध उत्पन्नात वर्धा तालुका अव्वल
दुधाच्या उत्पन्नात जिल्ह्यात वर्धा तालुका अव्वलस्थानी आहे. वर्धा तालुक्यात दिवसाला १८ हजार लिटर कच्च्या दुधाचे संकलन केले जाते. शिवाय गोरस भंडार या सहकारी तत्त्वावर आधारित संस्थेच्या माध्यमातून दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थाची निर्मिती केली जाते. या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना नियमित आवक होते. शिवाय येथील उत्पादनांनी देशभरात लोकप्रियता मिळविली आहे.
जिल्ह्यात १०८ मान्यताप्राप्त दूध संकलन केंद्र व संस्था आहे. या माध्यमातून दिवसाला होणाऱ्या दुधाच्या उत्पादनाची नोंद केली जाते. मात्र दुधाच्या चंदी, मिठाईकरिता होत असलेली परस्पर दुधाची विक्री, स्थानिक पातळीवर दुधाची होणारी परस्पर निर्यात याची नोंद कुठेच होत नसल्याचे दिसते. शिवाय अशी नोंद ठेवणारी कोणतीच संस्था अथवा यंत्रणा येथे नाही. त्यामुळे या उत्पादनाचा किंवा निर्मितीचा कुठेही उल्लेख होत नसतो. यावर कुणाचाही देखरेख नसल्याने प्रत्यक्षात नोंद होत असलेल्या आकडेवारीपेक्षा अधिक दुधाचे संकलन जिल्ह्यात होत असल्याची बाब समोर येते.

Web Title: 22 thousand liters of milk export

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.