वर्धा जिल्हयातील २२० कामगार उत्तरप्रदेशात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 07:08 PM2020-05-03T19:08:17+5:302020-05-03T19:08:44+5:30

वर्धेत आल्यावर येथील लोकांनी आमची आई वडीलांप्रामाणे काळजी घेतली. केवळ आमच्या जेवणाचाच प्रश्न यांनी सोडवला नाही तर कपडे, चप्पल, इत्यादी जीवनावश्यक साहित्यासोबतच परतीच्या प्रवासाचे तिकीट आणि प्रवासात जेवणाचे डबेही दिलेत अशी भावनिक प्रतिक्रिया राम मनोहर वर्मा या कामगाराने व्यक्त केली.

220 workers from Wardha district sent to Uttar Pradesh | वर्धा जिल्हयातील २२० कामगार उत्तरप्रदेशात रवाना

वर्धा जिल्हयातील २२० कामगार उत्तरप्रदेशात रवाना

Next
ठळक मुद्देहमारा बच्चे जैसा खयाल रखा


लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा: लॉकडाऊननंतर रोजगार गेल्यामुळे आम्ही इकडे तिकडे भटकत होतो. वर्धेत आल्यावर येथील लोकांनी आमची आई वडीलांप्रामाणे काळजी घेतली. केवळ आमच्या जेवणाचाच प्रश्न यांनी सोडवला नाही तर कपडे, चप्पल, इत्यादी जीवनावश्यक साहित्यासोबतच परतीच्या प्रवासाचे तिकीट आणि प्रवासात जेवणाचे डबेही दिलेत अशी भावनिक प्रतिक्रिया राम मनोहर वर्मा या कामगाराने व्यक्त केली.
लखनऊला जाणारी रेल्वे गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरून रविवारी सायंकाळी 6 वाजता सुटली. यामध्ये वर्धा जिल्हयात अडकलेल्या 220 कामगारांना आज विशेष बसगाडयांनी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचवण्यात आले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधिक्षक बसवराज तेली, मुख्य कायार्कारी अधिकारी सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, डॉ सचिन पावडे, प्रदीप बजाज यांनी नवजीवन छात्रावास येथे कामगारांना निरोप दिला. यावेळी काही कामगारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
या जिल्हयाचा पाहूणचार घेवून आम्ही जात आाहोत आाणि हा पाहुणचार आमच्या कायम लक्षात राहील. या जिल्हयाचे ही खासियत आम्ही आमच्या घरच्यांनाही सांगू असे वर्मा यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी कामगारांना स्वस्थ आारोग्याच्या शुभेच्छा देतांना परिस्थिती पूर्व पदावर आल्यावर या जिल्हयात आपले पुन्हा स्वागत करू. तुम्ही ग्रीन झोनमधून जात असल्यामुळे प्रावासात सामाजिक अंतर व स्वच्छतेची काळजी घ्या. नागपूरहून निघणारी गाडी आपल्याला लखनऊला सोडेल. पूढे उत्तर प्रदेश सरकार तुम्हाला तुमच्या गावापर्यत पाहेचवेल. प्रवास लांबचा असल्यामुळे काळजी घ्यावी. पोहचल्यावर दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करुन सुरक्षित असल्याचे कळवा असे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सांगितले.

Web Title: 220 workers from Wardha district sent to Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.