वर्षभरात गांधी आश्रमला २.२३ लाख पर्यटकांची भेट

By admin | Published: April 4, 2015 02:05 AM2015-04-04T02:05:42+5:302015-04-04T02:05:42+5:30

येथील महात्मा गांधी यांचे आश्रम स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र होते. ते आता जगासाठी प्रेरणास्थान बनू पाहत आहे.

2.23 lakh tourists visit Gandhi Ashram every year | वर्षभरात गांधी आश्रमला २.२३ लाख पर्यटकांची भेट

वर्षभरात गांधी आश्रमला २.२३ लाख पर्यटकांची भेट

Next

बापू कुटीची ‘क्रेझ’ कायम : देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी
दिलीप चव्हाण ल्ल सेवाग्राम

येथील महात्मा गांधी यांचे आश्रम स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र होते. ते आता जगासाठी प्रेरणास्थान बनू पाहत आहे. या बापू कुटीला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशपातळीवर महत्त्व असलेल्या या आश्रमला एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या काळात २ लाख २३ हजार ५८६ पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आहे.
महात्मा गांधी १९३६ मध्ये सेवाग्रामला आले. तिथे त्यांच्या वास्तव्याकरिता आश्रमची स्थापन करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने येथे कार्यकर्त्यांची संख्या वाढायला लागली. आश्रम व्रतांवर आधारित असल्यासने आश्रमीय जीवनाचा अंगिकार करून देशासाठी कार्यकर्ता आश्रमात घडू लागला. येथूनच रचनात्मक कार्यक्रमाची सुरुवात, स्वातंत्र्य चळवळीची दिशा, चर्चा, बैठका आदी या होवू लागले. १९४२ चा भारत छोडोचा ठरावही याच आश्रमात झाल्याचे इतिहास सांगत आहे.
आश्रमात तब्बल दहा वर्ष बापूंचे वास्तव्य राहिले. बापंूची कर्मभूमी आणि वास्तू देशासाठीच नव्हे, तर विश्वासाठी दिशा देणारे प्रेरणास्थान बनले आहे. या आश्रमात आल्यावर वेगळीच उर्जा मिळते असे येथे येणाऱ्या पर्यटकांनी त्यांच्या प्रतिक्रीयेत लिहिले आहे. वर्धा शहराला लागून असलेल्या या सेवाग्राम आश्रमाला राजकीय व सामाजिक क्षेत्रात देशपातळीवर काम करणाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.
आश्रमात यंदाच्या वर्षाला मोठमोठे चिंतन शिबिर झाले. येथूनच दिशा ठरवून देशपातळीवर करण्यात येणार असलेल्या मागण्यांसदर्भात मोर्चे काढण्यात आले. राजकीय क्षेत्रात राबविण्यात येणार असलेल्या नवनव्या अजेंड्यावरही याच आश्रम परिसरात चर्चा झाली. आश्रमातील साध्या जीवनशैलीमुळै अनेक जण भारावून गेले आहेत. आश्रमात कोणतीही मोठी व्यक्ती असो तिचे स्वागत करण्याची एकच प्रथा आहे. या प्रथेवरून आश्रमात आजही महात्मा गांधीच विचाराप्रमााणेच मोठा छोटा असा भेदभाव होत नसल्याचे दिसत आहे.

अनेक चिंतन शिबिरातून झाली राष्ट्रीय विषयांवर चर्चा
आश्रम परिसरात यंदाच्या सत्रात विविध विषयांवर चर्चा झाली. यात सध्या चर्चेत असलेल्या भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात अण्णा हजारे यांनी याच आश्रमात त्यांच्या कार्यकर्त्यांची सभा घेतली. यावेळी मेधा पाटकर यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित झाले होते. या व्यतिरिक्त ग्वाल्हेर येथील एका मोठ्या शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी येथे वास्तवाकरिता होते. तर शेतकऱ्याच्या समस्यांवर राष्ट्रीय चर्चासत्रही होवून आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली.

शैक्षणिक सहलीही वाढल्या
महात्मा गांधी यांच्या कार्याची व त्यांच्या साध्या जीवनशैलीची माहिती नवीन पिढीसाठी दिशादर्शक आहे. महात्मा गांधी यांच्या कार्याची माहिती पुस्तकातून होत असली तरी त्यांच्या जीवनाची खरी माहिती देणारे हे आश्रम आहे. असे म्हणत येथे यंदाच्या सत्रात शैक्षणिक सहलींची संख्या वाढली आहे. चिमुकल्यांनी येथे येत महात्मा गांधी यांच्या साध्या राहणीतून शिक्षा घ्यावी व भौगोलिक सुखाच्या अधीन होत असलेल्या नव्या पिढीला दिशा मिळावी, अशी अपेक्षा असल्याच्या प्रतिक्रीया येथे आलेल्या काही शिक्षकांनी नोंद वहीत दिल्या आहेत.

Web Title: 2.23 lakh tourists visit Gandhi Ashram every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.