निवडणुकीसाठी २,२८८ मतदान यंत्र सज्ज

By admin | Published: October 11, 2014 02:03 AM2014-10-11T02:03:42+5:302014-10-11T02:03:42+5:30

विधानसभा निवडणुकीकरिता १ हजार ५०९ कंट्रोल युनिट व २ हजार २८८ बॅलेट युनिटसह व्हिव्हिपॅट मतदान यंत्राची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

2,288 polling equipment ready for election | निवडणुकीसाठी २,२८८ मतदान यंत्र सज्ज

निवडणुकीसाठी २,२८८ मतदान यंत्र सज्ज

Next

वर्धा : विधानसभा निवडणुकीकरिता १ हजार ५०९ कंट्रोल युनिट व २ हजार २८८ बॅलेट युनिटसह व्हिव्हिपॅट मतदान यंत्राची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. चारही विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांच्या नावाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र मतदानासाठी सज्ज झाले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी एन. नवीन सोना यांनी मतदान यंत्रांची तपासणी तसेच मतदान यंत्र सिल करण्याच्या प्रक्रियेची पाहणी करून संपूर्ण मतदान यंत्राच्या सुरक्षेसंबंधी आढावा घेतला.
जिल्ह्यातील वर्धा व देवळी विधानसभा मतदारसंघात १५ पेक्षा जास्त उमेदवार असल्यामुळे अतिरीक्त बॅलेट युनिट राहणार आहेत. त्यासोबतच वर्धासाठी ४४८ व्हिव्हिपॅट मतदान यंत्राची तपासणी करून निवडणुक रिंगणात असलेल्या मतदाराच्या यादीप्रमाणे मतदान यंत्र सज्ज ठेवण्यात येऊन आयोगाच्या सुचनेप्रमाणे मतदान यंत्र सिल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे.
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या हैद्राबाद येथील अभियंत्याकडून संपूर्ण यंत्राची तपासणी होत असून, या प्रक्रियेमध्ये निवडणुकीदरम्यान कुठलेच यंत्र बंद पडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्यात. वर्धा विधानसभा मतदार संघासाठी लागणाऱ्या ईव्हिएम मशीनची तपासणी सामाजिक न्यायभवन येथे करण्यात आली. बुधवार दिनांक १५ आॅक्टोबर रोजी निवडणुकीसाठी इव्हिएम वाटपाचे कामही येथूनच पूर्ण होणार आहे. इव्हिएम मशीन ठेवण्यासाठी स्वतंत्र स्ट्राँग रूम तयार करण्यात आले असून येथे २४ तास पोलिसांचा पहारा ठेवण्यात येत आहे.
यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, वर्ध्याचे निरवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर व देवळी विधानसभा मतदार संघाचे शिरीष पांडे यांनी मतदानासाठी तयारी करण्यात आलेल्या ईव्हिएम मशीन व त्याच्या सुरक्षेबाबत माहिती दिली. आर्वी येथे गांधी विद्यालयात विधानसभा निवडणुकीसाठी अस्थायी कार्यालय सुरू करण्यात आले असून, निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया येथूनच पूर्ण होत आहे.
निवडणुकीकरिता ३४१ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र लागणार असून, ३१० मतदान केन्द्रावर मतदान घेण्यात येणार आहे. मतदान यंत्राची तपासणी पूर्ण झाली असून, स्ट्राँग रूममध्ये मतदान यंत्र ठेवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विलास ठाकरे यांनी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: 2,288 polling equipment ready for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.