२३३ वाहन चालकांचा परवाना केला निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 09:53 PM2018-12-17T21:53:56+5:302018-12-17T21:54:12+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना व वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळोवेळी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांना फाटा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाते. १ जानेवारी २०१८ ते १४ डिसेंबर २०१८ या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कारवाई करून चक्क २३३ बेशिस्त वाहनचालकांचे परवानेच निलंबित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना व वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळोवेळी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांना फाटा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाते. १ जानेवारी २०१८ ते १४ डिसेंबर २०१८ या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कारवाई करून चक्क २३३ बेशिस्त वाहनचालकांचे परवानेच निलंबित केले आहे.
दुचाकी प्रवासादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर महत्त्वाचा आहे. परंतु, पोलीस प्रशासनाकडून पोलीस अधीक्षकांची खांदेपालट झाल्यापासून हेल्मेट क्रमप्राप्त मोहीम थंडबस्त्यात पडल्याचे दिसून येते आहे. परंतु, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी हेल्मेटचे महत्त्व आणि दुचाकी चालकाची सुरक्षा हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून हेल्मेटचा वापर न करणाºया १८४ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणी सहा वाहनचालकांचा परवाना उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी निलंबित केला आहे. चारचाकीसह जड वाहन चालविताना सिटबेल्टचा वापर न करताना आढळून आल्याने सहा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करताना १७ वाहनचालक आढळून आल्याने त्यांच्याकडून २ हजारांचा दंडा आकारण्यात आला आहे. अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी ११७ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख ३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापैकी ४८ वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. वाहनात क्षमतेपेक्षा जादा साहित्य भरून वाहतूक करणे हा कायदेशीर गुन्हाच आहे. परंतु, अनेक वाहनचालक वाहतुकीच्या या नियमाकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरतो. ओव्हरलोड वाहतूक प्रकरणी ४०२ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी ४६ लाख ६० हजारांचा दंड वसूल केला आहे. तर १६८ वाहनचालकांची परवाने निलंबित करण्यात आले आहेत. धोकादायक वाहतूक प्रकरणी नऊ जनांवर कारवाई करून १८ हजारांचा दंड वसूल करून आठ जणांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
पथकाकडून या गोष्टींची होतेय तपासणी
सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकाने वाहन चालविताना हेल्मेटचा वापर केला की नाही.
वाहनचालविताना वाहनचालकाने सिटबेल्ट लावला की नाही.
कुठला वाहनचालक वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करतो काय.
वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन तर चालवित नाही ना.
वाहन चालकाजवळ विमा आहे की नाही तसेच कुठला वाहनचालक अवैध प्रवासी वाहतूक तर करीत नाही.