पाटबंधारे विभागात २३४ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:17 AM2018-07-22T00:17:56+5:302018-07-22T00:18:31+5:30

सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी जिल्ह्यात कार्य करणाऱ्या पाटबंधारे विभागाला सध्या अल्प मनुष्यबळामुळे घरघर लागली आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल २३४ पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अधिकच्या कामाचा भार पडत आहे.

234 posts are vacant in the Irrigation Department | पाटबंधारे विभागात २३४ पदे रिक्त

पाटबंधारे विभागात २३४ पदे रिक्त

Next
ठळक मुद्देअधिकारी व कर्मचाऱ्यांना मनस्ताप : करावे लागते नेहमीच अतिरिक्त काम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी जिल्ह्यात कार्य करणाऱ्या पाटबंधारे विभागाला सध्या अल्प मनुष्यबळामुळे घरघर लागली आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल २३४ पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अधिकच्या कामाचा भार पडत आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
प्राप्त माहितीनुसार वर्धा पाटबंधारे विभागात उप कार्यकारी अभियंत्यांचे एक पद मंजूर असून ते गत अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. तर कनिष्ठ अभि./शाखा अभि. /स.अ.श्रेणी-२ चे दोन पदे रिक्त आहेत. आरेखकचे एक, सहा. आरेखकचे एक, वरिष्ठ लिपीकाचे एक, कनिष्ठ लिपीकाचे दोन, टंकलेखकाचे एक, अनुरेखकाचे दोन, स्था. अभियांत्रिकी सहा.चे १२, वाहन चालकाचे तीन, नाईकचे एक, शिपाईचे १६, चौकीदाराची दोन पदे रिक्त आहेत. इतकेच नव्हे तर दप्तर कारकुणची १७, कालवे निरीक्षकाची ७९, मोजणीदारची ४२, संदेशकची ११, कालवे चौकीदारची ३१, कालवे टपलीची नऊ पदे रिक्त आहेत. वर्धा पाटबंधारे विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण ३३५ पदे मंजूर असली तरी सध्यास्थिती या विभागात केवळ १०१ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. अल्प मनुष्यबळामुळे विविध कामे प्रभावित होत असल्याने सदर विभागात पुरेसे मनुष्यबळ कार्यरत करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
पाण्याचा अपव्यय रोखणे ठरतेय कठीण
कालवे निरीक्षकांची ८८ पदे मंजुर असताना सध्या केवळ नऊच कर्मचारी सदर पदावर कार्यरत असल्याचे वास्तव आहे. प्रकल्पातील पाणी सोडल्यावर कुठला कालवा फटला तर नाही ना तसेच कुठे पाण्याचा अपव्यय तर होत नाही ना याची शहानिशा हे कर्मचारी करतात. परंतु, अल्पमनुष्यबळामुळे सध्या होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी अनेक अडचणींचा सामनाच वर्धा पाटबंधारे विभागाला करावा लागत आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कालवे चौकीदार महत्त्वाचे ठरतात. परंतु, सध्यास्थितीत ३३ पैकी ३१ कालवे चौकीदारांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पाठपुराव्याकडे दुर्लक्षच?
वर्धा पाटबंधारे विभागाला रिक्त पदांचे ग्रहणच लागले आहे. तेथे पुरेसे मनुष्यबळ कार्यरत व्हावे यासाठी संबंधितांकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे; पण संबंधित अधिकारी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्षच करीत असल्याने कार्यरत कर्मचाºयांच्या अडचणीत भर पडली आहे.

Web Title: 234 posts are vacant in the Irrigation Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.