२४ प्रतिकृती जाणार राज्यस्तरावर
By admin | Published: September 21, 2015 01:54 AM2015-09-21T01:54:40+5:302015-09-21T01:54:40+5:30
जि.प. शिक्षण विभागाद्वारे इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन १८ ते २० सप्टेंबर दरम्यान घेण्यात आले.
इन्स्पायर अवॉर्ड प्रदनर्शन : ३२१ विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सहभाग
वर्धा : जि.प. शिक्षण विभागाद्वारे इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन १८ ते २० सप्टेंबर दरम्यान घेण्यात आले. यात ३२१ विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सहभाग घेतला. यात सादर झालेल्या २४ प्रतिकृतींची राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
शुक्रवारी उद्घाटन झालेल्या इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचा समारोप रविवारी अग्निहोत्री पॉलिटेक्निक कॉलेज नागठाणा रोड येथे झाला. अध्यक्षस्थानी शिक्षक आ. नागो गाणार तर अतिथी म्हणून खा. रामदास तडस, जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा व तंत्रज्ञानी व्हावे, असे मत खा. तडस यांनी व्यक्त केले. गाणार यांनी विज्ञान शिकताना शिस्तबद्ध असावे. त्यांनी न्युटन व आर्किमेडीजचा सिद्धांत सोप्या भाषेत सांगितला. विद्यार्थ्यांनी चिकित्सक असावे, असेही सांगितले. भेंडे यांनी येथे सर्व प्रकारची व्यवस्था करण्याचा शिक्षण विभागाने प्रयत्न केला. गौरी पूजनाचा सण असला तरी ३२१ विद्यार्थ्यांसह शिक्षक उपस्थित झाले, हे अभिनंदनिय असल्याचे सांगितले.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला शिक्षणाधिकारी (माध्य.) विश्वास लबडे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) धनराज तेलंग, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) अशोक लांजेवार, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक उषा तळवेकर, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधींनी विविध समित्यांमध्ये सहभाग घेत सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन साळवे यांनी केले तर आभार उषा तळवेकर यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)