सार्थक जीवनासाठी मूल्यशिक्षणाचे २५ राजदूत दिल्ली वारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:32 PM2017-12-08T23:32:04+5:302017-12-08T23:32:25+5:30

दिवसेंदिवस मूल्य शिक्षणाचा ºहास होत असून त्याचे परिणाम म्हणून समाजात अशांतता, जातीभेद, असहिष्णुता आणि हिंसा पहावयास मिळते.

25 ambassadors of fundamentalism for meaningful living, Delhi Varli | सार्थक जीवनासाठी मूल्यशिक्षणाचे २५ राजदूत दिल्ली वारीला

सार्थक जीवनासाठी मूल्यशिक्षणाचे २५ राजदूत दिल्ली वारीला

Next
ठळक मुद्देगांधी जिल्ह्याचा अनोखा उपक्रम : चार दिवसात घेणार गांधींच्या स्मृतीस्थळांची भेट

आॅनलाईन लोकमत
वर्धा : दिवसेंदिवस मूल्य शिक्षणाचा ºहास होत असून त्याचे परिणाम म्हणून समाजात अशांतता, जातीभेद, असहिष्णुता आणि हिंसा पहावयास मिळते. मूल्यसंस्काराचे बाळकडू लहानपणीच मुलांना मिळावे आणि सुदृढ, समतोल विचारांची पिढी घडावी म्हणून गांधी जिल्हा अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्याने पुढाकार घेत एक अनोखा उपक्रम राबविला आहे. महात्मा गांधींनी दिलेले वचन आणि मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी निवड करण्यात आलेल्या २५ ‘ब्रँड अँबेसिडर’ विद्यार्थ्यांना आज विमानाने दिल्लीवारी करण्याची संधी मिळाली. खा. रामदास तडस आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विद्यार्थ्यांच्या गाडीला हिरवी झेंडी दाखवून मुलांना रवाना केले.
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने बालकांमध्ये शालेय अवस्थेपासून गांधीजींचे मूल्य रूजवण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून जिल्हा प्रशासनाच्यावतीने २ आॅक्टोबर २०१६ पासून उडाण प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था जिल्हा परिषद शिक्षण विभाग, गांधी विचार परिषद आणि नई तालीम सेवाग्राम यांचे सहकार्य घेण्यात आले.
सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका आणि काही खासगी शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. मुलांना विविध प्रात्यक्षिक आणि स्पर्धेच्या माध्यमातून मूल्य शिक्षणाचे धडे देण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय मूल्यांची शिकवण प्रत्यक्ष कृतीतून आणि विविध उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली. त्याचबरोबर सार्थक जीवनासाठी मूल्यशिक्षण अंतर्गत संस्कारपर्व पुस्तक विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, शांती, अहिंसा, सहिष्णूता, संवेदनशिलता, सौजन्य, श्रमप्रतिष्ठा, स्त्री पुरूष समानता, वक्तशीरपणा या दहा मूल्यांवर आधारीत शिक्षण व प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय जिल्हाधिकारी यांनी स्वत: मुख्याध्यापकांचे या विषयांवर उद्बोधन केले. वर्षभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमात शाळांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हास्तर अशा विविध टप्प्यावर सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील इयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंतचे १ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील २५ विद्यार्थी गुणवत्तेत चमकले. यात ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील २० विद्यार्थी आहेत. या २५ विद्यार्थ्यांना मूल्य संस्काराचे राजदूत म्हणून दिल्लीवारी करण्याची संधी उडाण प्रकल्पाद्वार ेमिळाली आहे.
या वारीत चार दिवस विद्यार्थी गांधीजींचे वास्तव्य असलेली ठिकाणे आणि संस्थांना भेट देतील. तसेच राष्ट्रपती भवन, संसद भवन, संसदेतील ग्रंथालय, इंडिया गेट आणि दिल्लीतील महत्वाच्या ठिकाणांना भेट देऊन माहिती घेतील. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद शाळांमधील पाच शिक्षक आणि डाएटच्या प्रा. महाजन सहभागी झाल्या असून त्या विद्यार्थ्यांना माहिती देणार आहे.

Web Title: 25 ambassadors of fundamentalism for meaningful living, Delhi Varli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.