रेती तस्करांकडून २५ लाख वसूल
By admin | Published: April 1, 2016 02:27 AM2016-04-01T02:27:30+5:302016-04-01T02:27:30+5:30
येथील रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असल्याचे दिसून आले आहे. यावर अंकुश लावण्याकरिता तहसीलदार सचीन यादव यांनी
समुद्रपूर : येथील रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असल्याचे दिसून आले आहे. यावर अंकुश लावण्याकरिता तहसीलदार सचीन यादव यांनी कारवाईचे धाडसत्र करून एकूण ६६ वाहनांवर कारवाई केली. यातून एकूण २५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती तहसीलदारांकडून देण्यात आली.
समुद्रपूर तालुक्यात जून महिन्यापासून ही कारवाई सुरू झाली. कारवाई करताना तहसीलदारांनी एक नाव आणि एक पोकलँड जप्त केला आहे. रेंती तस्करांनी विदर्भात अनेक अधिकाऱ्यावर हल्ले केले आहेत. वर्धेतही तशा घटना घडल्या आहेत. असे असताना सचिन यादव यांनी रात्री अपरात्री घाटावर जाऊन कारवाईचा सपाटा लावला. तालुक्यातील रेती घाटवर रेती चोरण्याचे काम जोरात सुरू होते. यादव यांनी पदभार स्वीकारताच रेती चोरीवर केलेल कारवाईमुळे चांगलीच भीती निर्माण झाली. यामुळे येथे रेती चोरीला लगाम लाल्याची माहिती आहे.(तालुका प्रतिनिधी)