चोरट्या मार्गावर २५० कर्मचाऱ्यांचा ‘वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 05:00 AM2020-04-29T05:00:00+5:302020-04-29T05:00:21+5:30

चारचाकी रस्ते, दुचाकी रस्ते, पायदळ रस्ते तसेच नदीतून नाव किंवा डोंग्याने येणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. हे सर्व ६१ ही मार्ग नाली खोदून, बॅरिगेट्स लावून, मातीचा भरावा टाकू न, काटेरी कुंपन करुन व टिनपत्रे लावून बंद केले आहे. प्रत्येक ठिकाणी चार शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून दोन कर्मचारी सकाळी तर दोन कर्मचारी रात्रीला आपले कर्तव्य बजावणार आहेत. कोरोनाबाधित जिल्ह्यातून कोणताही व्यक्ती आता वर्धा जिल्ह्यात प्रवेश करणार नाही.

250 employees' watch on the stolen route | चोरट्या मार्गावर २५० कर्मचाऱ्यांचा ‘वॉच

चोरट्या मार्गावर २५० कर्मचाऱ्यांचा ‘वॉच

Next
ठळक मुद्देप्रशासनाने ६१ मार्गांचा घेतला शोध : प्रत्येक मार्गावर दिवस-रात्र चार कर्मचारी तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सीमाबंदी असतानाही लगतच्या कोरोनाबाधित जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने ये-जा सुरुच आहे. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांपासूनच आता वर्ध्याला धोका असल्याने त्यांना रोखण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल ६१ चोरट्या मार्गांचा शोध घेऊन तेथे नाकाबंदी करण्यात आली आहे. या सर्व तपासणी नाक्यांवर २४२ शासकीय कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आल्याने आता वर्ध्यात प्रवेश करणे अवघड झाले आहे.
जिल्ह्यालगत असलेल्या यवतमाळ, अमरावती व नागपूर हे तिन्ही जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. या ठिकाणी दरदिवशी रुग्णसंख्या वाढतच आहे. अद्याप वर्धा जिल्हा हा ‘ग्रीन झोन’ मध्ये आहे. पण, या कोरोनाबाधित जिल्ह्यातून आवागमन करणाऱ्यांपासून वर्ध्यालाही धोका होण्याची शक्यता बळावल्याने जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करीत जिल्ह्यालगतच्या कोरोनाबाधित जिल्ह्यातून येणाऱ्या मुख्य मार्गाशिवाय चोरटे मार्गही शोधून काढले आहे. यामध्ये चारचाकी रस्ते, दुचाकी रस्ते, पायदळ रस्ते तसेच नदीतून नाव किंवा डोंग्याने येणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. हे सर्व ६१ ही मार्ग नाली खोदून, बॅरिगेट्स लावून, मातीचा भरावा टाकू न, काटेरी कुंपन करुन व टिनपत्रे लावून बंद केले आहे. प्रत्येक ठिकाणी चार शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून दोन कर्मचारी सकाळी तर दोन कर्मचारी रात्रीला आपले कर्तव्य बजावणार आहेत. कोरोनाबाधित जिल्ह्यातून कोणताही व्यक्ती आता वर्धा जिल्ह्यात प्रवेश करणार नाही. कुणीही नियम तोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला दंडात्मक कारवाईसह फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

गावागावात निगरानी पथक अ‍ॅक्टिव्ह
जिल्ह्यात अवैध मार्गाने काही ग्रामस्थ प्रवेश करीत असून त्यांच्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: यवतमाळ, चंदपूर, नागपूर, अमरावती या जिल्ह्यातून अनेक ग्रामस्थ प्रशासनाची परवानगी न घेता जिल्ह्यात अवैधरित्या प्रवेश करीत आहे. यापैकी चंद्रपूर वगळता इतर तिन्ही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातून येणाऱ्यांवर निगराणी ठेवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना निगरानी पथक स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी झूम अ‍ॅपच्या माध्यमातून सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधत मंगळवारी सायंकाळी ६ वाजतापर्यंत गावातील दहा ते पंधरा व्यक्तींचे निगरानी पथक तयार करुन पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत माहिती कळविण्याच्या सूचना केल्या आहे.

निगरानी पथकाची जबाबदारीसह कर्तव्य
गावात येणारे सर्व रस्ते व आडमार्ग बंद करुन अवैध मार्गाने येणाºया नागरिकांवर लक्ष ठेवणे. ज्यांच्याकडे परवानगी नाही अशांना गावामध्ये प्रवेश नाकारुन त्याची माहिती प्रशासनाला देणे. २४ तास गस्त घालून निदर्शनास आलेली माहिती बीडीओमार्फत प्रशासनाला देणे. जे ग्रामस्थ कोरोनाच्या प्रतिबंधित कालवधीत गावात वास्तव्यास नव्हते, अशाही ग्रामस्थांना गावात प्रवेश नाकारणे व प्रशासनाला माहिती देणे. गावात भीतीचे किंवा संभ्रमाचे वातावरण निर्माण होणार नाही, यासाठी समुपदेशन करणे. तसेच माल वाहतुकीस कोणताही प्रतिबंध होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पत्रकातून कळविले आहे.

कोरोनाबाधित जिल्ह्यातून येणारे चोरटे मार्ग
वर्धा ते यवतमाळ

यवतमाळातून वर्धा जिल्ह्यात प्रवेश करण्याकरिता पुलगाव, देवळी, अल्लीपूर व वडनेर या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुख्य मार्ग वगळता २७ चोरटे मार्ग असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये कांदेगाव, तांबा, बाभुळगाव, सावंगी (येंडे), हिवरा (कावरे), नांदगाव फाटा, निमगव्हाण, शिरपूर (लहान पूल), बोपापूर (खर्डा), रोहणी(वसू), शिरपूर, आंजी-अंदोरी, पोटी ते वारा, पोटी ते सदमा, कापसी, कान्होली, साती, पोटी, कात्री, कान्होली ते जागजई, साती ते आष्टा, पारडी, यवती ते पोहणा, आजनसरा, रोहणी, डाखुरा घाट या मार्गांचा समावेश आहे.

वर्धा ते अमरावती
अमरावती जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत येण्याकरिता पुलगाव, आर्वी, तळेगाव व आष्टी या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून १६ चोरटे मार्ग आहेत. यामध्ये पिंपळगाव, वडाळा, सालफळ, मार्डा, दर्यापूर,लाडेगाव, देऊरवाडा, टाकरखेडा, धनोडी, वडगाव (पांडे), टाकरखेडा ते खडका, धनोडी ते मगरुळ (दस्त.), दिघी (होनाडे), नेर पिंगळाई ते अंतोरा, परतोडा, खडका, भिष्णूर, भारसवाडा, टेकोडा, गोदावरी, इस्माईलपूर, वाघोली, सिर्सोली, दलपतपूर, बेलोरा या मार्गांचा समावेश असून हे सर्व मार्ग आता बंद करण्यात आले आहे.

वर्धा ते नागपूर
नागपूर जिल्ह्यातून वर्ध्यात प्रवेश करण्यासाठी समुद्रपूर, गिरड, सिंदी (रेल्वे) व सेलू या चार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १८ चोरटे मार्ग बंद करण्यात आले आहे. यामध्ये कुर्ला, रामतलाव ते बोथली, खुर्सापार ते धामनगाव (गवते), खुर्सापार ते कवडापूर, गणेशपूर ते पिंपळा, तावी ते भिवी, फरिदपूर ते भिवी, आसोला ते मस्तान शाह, बरबडी ते कांढळी, बेला (आष्टा) ते वाकसूर, सावंगी (आसोला) ते सेलडोह, मांगली ते सिंदी, सावंगी (आसोला) ते परसोडी, जसापूर ते विखनी, चौकी, गरमसूर, खापरी आणि शिवगाव या मार्गांचा समोवश आहे.
जिल्ह्यात अनधिकृतरीत्या प्रवेश करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून २ हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल. बाहेरुन आलेली व्यक्ती ज्यांच्याकडे वास्तव्यास असेल त्याही व्यक्ती फौजदारीसह दंडात्मक कारवाईस पात्र ठरले. होम क्वारंटाईन व्यक्ती फिरताना दिसून आल्यास त्याच्यावरही दंडात्मक कारवाई होणार आहे. गावपातळीवर निगरानी पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले आहे.
-विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

Web Title: 250 employees' watch on the stolen route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.