२५० आॅनलाईन केंद्र राहणार उशिरापर्यंत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:38 AM2017-09-14T00:38:59+5:302017-09-14T00:39:16+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे. पुढील दोन दिवस रात्री उशिरापर्यंत शेतकºयांचे अर्ज भरून घेण्यासाठी सर्व २५० आपले सरकार सेवा केंद्र व सुविधा केंद्र सुरू राहणार असून याचा शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यामुळे शेतकºयांची सर्व माहिती जमा होत असून योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ३२ हजार शेतकरी कुटुंबाची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. तसेच अतिशय अडचणीत असलेल्या शेतकºयांच्या घरी जाऊन आॅनलाईन अर्ज भरून घेण्यात आले आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी एकच अर्ज सादर करावा. स्वतंत्र अर्ज विचारात घेतला जाणार नाहीत. स्वतंत्ररीत्या सादर केलेले अर्ज़ लिंक करण्यासाठी सेवा केंद्रावर संपर्क साधावा. मयताच्या थकित कर्जात वारसांनी आपापले हिस्से बँकेकडून निश्चित करुन घ्यावेत. त्या आधारे अर्जदारांनी स्वत:च्या अर्जात त्या खात्याबाबतची माहिती नमूद करावी. संयुक्त खाते धारकांनी घेतलेल्या थकित संयुक्त कजार्पैकी आपापले हिस्से बँकेकडून निश्चित करून घ्यावेत. त्याधारे स्वत:च्या अर्जात त्या खात्याबाबतची माहिती नमूद करण्याचेही कळविण्यात आले आहे.
गरमसूरवासियांची अडचण झाली दूर
जंगलव्याप्त असलेल्या गरमसूर या गावाच्या परिसरात वाघिणीचा वावर असल्याने या गावात जाऊन सर्व पात्र शेतकºयांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. अशाच पद्धतीची अडचण असल्यास गावातील शेतकºयांनी महाआॅनलाईनचे प्रतिक उमाटे, सुविधा केंद्राचे नंदकिशोर कावळे, शहजाद शेख यांच्याशी संपर्क साधावा. एकही शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.