एनसीसी छात्र सैनिकांकडून २५०० राख्या सीमेवरील सैनिकांना पाठविल्या
By अभिनय खोपडे | Published: August 6, 2022 12:26 PM2022-08-06T12:26:30+5:302022-08-06T12:30:02+5:30
आर्वी व देवळी येथील २१ महाराष्ट्र बटालियनचा उपक्रम
वर्धा : प्रहार समाज जागृती संस्था व एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील एन.सी.सी. युनिट तर्फे १५०० तर आर्वी येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या छात्र सैनिकांनी १००० राख्या तयार करून सीमेवरील सैनिकांना पाठविल्या.
देवळी येथे 'सैनिकांकरीता राख्या' हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या एन.सी.सी. सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले तर प्रमुख अतिथी म्हणून कॅप्टन मोहन गुजरकर, प्रा. जगदीश यावले व प्रा. मेघा फासगे उपस्थित होते.
संचालन कॅडेट कांचन राऊत व मयुरी उईके यांनी केले तर आभार कॅडेट सुप्रिया यादव यांनी मानले. आर्वी येथील गांधी विद्यालयातील एनसीसी छात्र सैनिक तसेच वर्ग पाच ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सीमेवरील सैनिकांकरिता राख्या पाठविल्या.
विद्यार्थ्यांनी विविध कल्पनेतून सैनिकांकरता सुंदर अशा राख्या तयार केल्या तसेच त्यांना शुभेच्छापर पत्रसुद्धा लिहिली. आपल्या सैनिकांकरताची भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी आणि सुट्ट्यांमध्ये सैनिक घरी येऊ शकत नाहीत तर त्यांना सुद्धा राख्या पोहोचल्या पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमासाठी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे यांनी प्राचार्य शुभांगी इंगोले यांच्याकडे राख्यांचा बॉक्स दिला.
या उपक्रमासाठी ट्वेंटीवन महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर देवी भास्कर यांनी सुद्धा छत्र सैनिकांचे कौतुक केले