देवळीत २९ किमी भूमिगत तारमार्गाचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:35 PM2018-01-20T23:35:51+5:302018-01-20T23:36:10+5:30

संपूर्ण शहरातील २९ किमी अंतराच्या उपरी तारमार्गाचे भूमिगत तारमार्गात रूपांतर होणार आहे. यासाठी आवश्यक १८.५० कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती माहिती खा. रामदास तडस यांनी दिली.

 29 km underground tunnel network | देवळीत २९ किमी भूमिगत तारमार्गाचे जाळे

देवळीत २९ किमी भूमिगत तारमार्गाचे जाळे

Next
ठळक मुद्देरामदास तडस : आयपीडीएस योजनेतून १० कोटींची कामे

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : संपूर्ण शहरातील २९ किमी अंतराच्या उपरी तारमार्गाचे भूमिगत तारमार्गात रूपांतर होणार आहे. यासाठी आवश्यक १८.५० कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती माहिती खा. रामदास तडस यांनी दिली.
केंद्र शासन पुरस्कृत इंटीग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम (आयपीडीएस) योजनेतील १० कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यांच्या हस्ते या कामांचा मुहूर्त साधण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष सुचिता मडावी, माजी जि.प. सभापती मिलिंद भेंडे, न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, गटनेता शोभा तडस, बांधकाम सभापती सारिका लाकडे व कार्यकारी अभियंता उत्तम उरकुडे उपस्थित होते.
विकास कामात शहरातील ११ के.व्ही. वाहिनी, नवीन ट्रान्सफार्मर, भूमिगत केबलींग तसेच एलटी वाहिनी आदी कामे घेण्यात आली. आधी अस्तित्वात असलेल्या दोन पॉवर ट्रान्सफार्मरच्या क्षमतेत वाढ करून ते ५ एमव्हीएऐवजी १० एमव्हीए करण्यात आली. तसेच १४.५ किमी अंतराच्या ११ के.व्ही. उपरी तारमार्ग वाहिणीच्या बांधकामात बकाने ले-आऊट, मुक्ताईनगर, साईनगर, लक्ष्मीनारायण नगर, खाडे ले-आऊट, इंदिरा नगर मोठी आई, डिगडोह रोड, नांदोरा रोड तसेच औद्योगिक वसाहतीतील ३३ केव्ही ते यशोदा नदी आदी परिसराचा समावेश करण्यात आला. ११ केव्ही भूमिगत वाहिणीच्या ५ किमी अंतरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पोलीस ठाणे, आचार्य डीपी, फरस, राहुल काशीकर, गोपाल दुधडेअरी, दत्त चौक, इंदिरा गांधी पुतळा, बसस्थानक आदी मार्गाचा समावेश करण्यात आला. नवीन १६ रोहित्र तसेच १२ किमी अंतराच्या लघुदाब वाहिनीचे काम हाती घेतले आहे. कार्यक्रमाला न.प. सदस्य नंदू वैद्य, सुनीता ताडाम, संगीता तराळे, अब्दुल नईम, श्रीकांत चाफले, अभियंता सुदेश होले तसेच महावितरणचे आणि न.प. कर्मचारी उपस्थित होते.

Web Title:  29 km underground tunnel network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.