देवळी पालिकेचा ३० कोटी खर्चाचा अर्थसंकल्प
By admin | Published: March 10, 2017 12:54 AM2017-03-10T00:54:37+5:302017-03-10T00:54:37+5:30
सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता देवळी पालिकेचा ३० कोटी खर्च व सहा लक्ष शिल्लकीचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर झाला.
खासदार, आमदार निधीत विविध कामे
देवळी : सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता देवळी पालिकेचा ३० कोटी खर्च व सहा लक्ष शिल्लकीचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर झाला. नगराध्यक्ष सुचिता मडावी यांनी विशेष सभेत हा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात नमूद विकास कामे व निधी याबाबत सदस्यात चर्चा होवून अर्थसंकल्प मंजूर झाला.
अर्थसंकल्पात शहरातील अनेक विकास कामे हाती घेवून खर्चाची तरतूद करण्यात आली. यामध्ये नवे शॉपींग सेंटर १ कोटी, स्थानिक विकास कार्यक्रम खासदार निधी २ कोटी, आमदार निधी ५ लक्ष, रस्ते बांधकाम १० लक्ष, वैशिष्टपूर्ण कामे १० कोटी, अल्पसंख्याक अनुदानातील कामे १० लक्ष, नगरोत्थान अनुदान १० लाख, विशेष रस्ता अनुदानातील कामे ५ कोटी, १४ वा वित्त आयोग अनुदानातील कामे न.प. प्राथमिक सोयी-सुविधेवर २ कोटी, घरकुल योजनेवर ५० लक्ष, स्वच्छ महाराष्ट्र अभियानावर १ कोटी, वॉर्ड विकासासाठी सर्व सदस्यांकरिता ८ लक्ष ५० हजार, रमाई घरकुल योजनेकरिता २५ लक्ष आदी कामांचा समावेश करण्यात आला. या व्यतिरिक्त अनेक कामांवर विशेष निधी खर्च करण्याचे प्रावधान आहे.
या सभेला मुख्याधिकारी विजय देशमुख, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, शिक्षण सभापती कल्पना ढोक, बांधकाम सभापती सारिका लाकडे, आरोग्य सभापती सुनिता बकाणे, महिला व बालकल्याण सभापती सुनिता ताडाम, सदस्य शोभा तडस, नंदू वैद्य, मिलिंद ठाकरे, मारोती मरघाडे, संगिता तराळे, संध्या कारोटकर, सुनील बासू, गौतम पोपटकर, श्याम महाजन, राजश्री देशमुख, संगिता कामडी, अश्विनी काकडे, अब्दुल नईम व सुरेश वैद्य यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)