वर्धा जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले ३० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 08:41 PM2020-08-13T20:41:55+5:302020-08-13T20:42:19+5:30

वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी कोरोनाच्या ३० रुग्णाची नोंद गुरुवारी घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आकडा ३४७ वर पोहचला आहे.

30 patients found in Wardha district on the same day | वर्धा जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले ३० रुग्ण

वर्धा जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले ३० रुग्ण

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा: जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी कोरोनाच्या ३० रुग्णाची नोंद गुरुवारी घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आकडा ३४७ वर पोहचला आहे. गुरुवारी आर्वी येथे ४ तर रोहणा येथे १, जाम, हिंगणघाट येथे १ व गिमा टेक्सटाईल्स छोटी वणी येथे १ याशिवाय सगुणा कंपनीत १४ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या. समुद्रपूर तालुक्यातही ४ रुग्णांची नोंद घेण्यात आली. यात हळदगाव येथील एका इसमाचा समावेश आहे. पुलगावच्या जाकिर हुसेन कॉलनीत १ व देवळी येथे २ तर सारवाडी येथे एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात सध्या अ?ॅक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या ८२ झाली असून आतापर्यंत २५६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title: 30 patients found in Wardha district on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.