स्वयंसेवकांनी तयार केला ३०० मीटरचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 11:36 PM2018-02-02T23:36:09+5:302018-02-02T23:36:26+5:30
स्थानिक विद्याविकास महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ‘स्वच्छतेकरिता युवाशक्ती’ या संकल्पनेवर आधारित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर धुमनखेडा येथे पार पडले. शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी ३०० मीटरचा रस्ता तयार केला तर सांडपाण्यासाठी ५०० मिटरची नाली तयार केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : स्थानिक विद्याविकास महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ‘स्वच्छतेकरिता युवाशक्ती’ या संकल्पनेवर आधारित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर धुमनखेडा येथे पार पडले. शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी ३०० मीटरचा रस्ता तयार केला तर सांडपाण्यासाठी ५०० मिटरची नाली तयार केली. शिबिराचे उद्घाटन तहसीलदार दीपक कारंडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग तुळसकर तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, आदर्श गाव प्रकल्प अधिकारी भारती ताकसांडे, जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता येणोरकर, सरपंच संगिता गेडाम, प्राचार्य डॉ. रमेश बोभाटे, उपप्राचार्य डॉ. संजूविलास कारमोरे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मेघश्याम ठाकरे, प्रा. विलास बैलमारे उपस्थित होते. या सात दिवसात धुमनखेडा येथील पशुपालकासाठी पशुरोग निदान शिबिर आयोजित केले होते.
त्यामध्ये डॉ. रोंघे, डॉ. उपवंशी, डॉ. उजवने यांनी ९० जनावरांवर चिकित्सा करून औषधोपचार केला. ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने रोगनिदान शिबिर आयोजित होते. यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. धिरज मेंडे, डॉ. रुचिरा कुंभारे यांनी रुग्णाची तपासणी करुन औषधोपचार केला. माधुरी भोयर, संध्या पाटील, अमोल राऊत, उज्वला महाकाळकर, निशा पाचखंडे, मनीषा भुयारी यांनी सिकलसेल व इतर रक्त तपासणी केली.
बौद्धीक सभेमध्ये प्रा. डॉ. रमेश तिखाडे, प्रा. अजय मोहोड यांनी ‘ध्येय’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर शेतकºयांसाठी कृषी विकास यावर जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी मार्गदर्शन केले. शेतीच्या विकासासाठी शासनाचे विविध उपक्रम हाती घेतले आहे. त्याची माहिती त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. राजविलास कारमोरे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.