पवनूरच्या गळाची रथयात्रेला ३०३ वर्षांची परंपरा, विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 02:19 PM2023-04-10T14:19:02+5:302023-04-10T14:20:45+5:30

पातालमाता देवी मंदिरात धार्मिक उत्सवाची रेलचेल

303 years old tradition of galachi Rath Yatra of Pawnor, famous far and wide in Vidarbha | पवनूरच्या गळाची रथयात्रेला ३०३ वर्षांची परंपरा, विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध

पवनूरच्या गळाची रथयात्रेला ३०३ वर्षांची परंपरा, विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध

googlenewsNext

आंजी (मोठी) : जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या पवनूर गावात मागील ३०२ वर्षांची प्राचीन परंपरा असलेल्या पातालमाता मंदिराने तिसऱ्या दशकात पदार्पण केले आहे. विदर्भात प्रसिद्ध असलेल्या गळाच्या रथयात्रेचे हे ३०३ वे वर्ष आहे. गळाची रथयात्रा अतिशय आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. तालुक्यातील अतिशय महत्त्वपूर्ण धार्मिक दृष्टीने मानल्या जाणाऱ्या पवनूर येथे गळाची रथयात्रा महोत्सवाचे आयोजन ११ एप्रिल रोजी करण्यात आले आहे.

गळाची रथयात्रा दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पवनूर येथे गावच्या शेवटच्या टोकावर पातालमाता देवीचे मंदिर आहे. हे मंदिर गावाचे ग्रामदेवता म्हणून ओळखले जाते. पातालमाता देवीवर भक्तांची श्रद्धा असून, मंदिरात अश्विन नवरात्र आणि चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो. चैत्र महिन्यात चैत्र वैद्य पंचमीच्या दिवशी गळाची रथयात्रा साजरी केली जाते. रथयात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे गावात अरिष्ट नये, गावातील सामाजिक सलोखा अबाधित टिकून राहावा यासाठी ही यात्रा गावकऱ्यांकडून काढली जाते.

एक लाकडी झुला लटकवून गावातील देवी भक्त अरुण लांडे आणि त्यांचे सहकारी संपूर्ण गावातून त्याची परिक्रमा करतात. एका लाकडी बैलबंडीपासून ५० फूट अंतरावर लाकडी झुला दोघेही सहकारी त्याला लटकवून संपूर्ण गावची प्रदक्षिणा करतात. शेवटी या यात्रेचा समारोप पातालमातेच्या मंदिरात होते.

या संपूर्ण गळाचा रथ सजविण्यासाठी गावातील स्थानिक गळ समिती असते ती या गळाची आकर्षक सजावट आणि चित्त थरारक रथ तयार करण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून झटत आहे. त्याला लागणारे दोर, लाकडी झुले आदी वस्तू अतिशय मजबूत पणे गळाचा रथ तयार करण्यात येत असतो. या यात्रेच्या दिवशी सासरी गेलेल्या मुली आवर्जून माहेरी येतात. तर वैशिष्ट्य म्हणजे यात्रेच्या दिवशी घरोघरी पाणग्याचा नैवेद्य दाखविला जातो.

ही यात्रा ६ एप्रिल गुरुवार रोजी प्रारंभ घटस्थापना आणि अखंड ज्योत अरुण वडणेरकर यांच्या हस्ते झाली असून, ७ एप्रिल रोजी गोंधळ व जागरण भजनाचा कार्यक्रम झाला. ८ एप्रिल रोजी आरोग्य तपासणी करण्यात आली. ९ रोजी गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ११ रोजी मनोहर जोशी यांच्या हस्ते देवीचा महाअभिषेक, होमहवन तसेच महाप्रसादाने सांगता होईल.

सायंकाळी ४ वाजता गळाच्या रथयात्रेला प्रारंभ होणार आहे. यात्रेला पंचक्रोशीतील भाविकांची लक्षणीय उपस्थिती असते. यात्रा महोत्सवामुळे गावात नवचैतन्य पसरले आहे. यात्रा महोत्सवाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पवनूर येथील गावकऱ्यांनी केले आहे.

Web Title: 303 years old tradition of galachi Rath Yatra of Pawnor, famous far and wide in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.