नोकरीच्या नावावर ३१ हजारांचा गंडा
By admin | Published: May 7, 2016 02:09 AM2016-05-07T02:09:23+5:302016-05-07T02:09:23+5:30
नोकरी लावून देण्याच्या नावावर एका इसमास ३१ हजारांनी गंडविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
युवक मुंबईतील : पोलिसात गुन्ह्याची नोंद
आर्र्वी : नोकरी लावून देण्याच्या नावावर एका इसमास ३१ हजारांनी गंडविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पोलीस सूत्रानुसार, हेमराज विठ्ठल बन्नगरे (३८) रा. गोवर्धन वॉर्ड, हाऊसिंग सोसायटी, मुंबई याला एका भ्रमणध्वनीवरुन फोन आला. यावेळी त्याला रिलायन्स कंपनीमध्ये नोकरी असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यासाठी ३१ हजार रुपये बँकेत भरावे लागतील असेही सांगण्यात आले. यासाठी त्याला बँक खात्याचा क्रमांकही देण्यात आला. यावरून सदर इसमाने त्या क्रमांकावर ३१ हजार रुपये भरले. हा इसम कारंजा येथे गुरूवारी लग्नासाठी आला होता. यावेळी त्याने सदर क्रमांकावर फोन केला असता तो बंद दाखवत होता. यात आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्याने आर्वी ठाण्यात सदर इसमाविरूद्ध तक्रार दाखल केला. तक्रारीवरून भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहे. अशा घटना घडत असून पोलिसांकडून जनजागृतीची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)