भंगार विक्रीतून पालिकेची ३.१५ लाखांची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 02:37 PM2018-02-28T14:37:08+5:302018-02-28T14:38:59+5:30
भंगार विक्रीतून वर्धा नगर परिषदेने ३.१५ लाखांची कमाई केली आहे
वर्धा : भंगार विक्रीतून वर्धा नगर परिषदेने ३.१५ लाखांची कमाई केली आहे. सदर भंगार विक्रीकरिता पालिकेने आॅन लाईन पद्धतीने निविदा मागविल्या होत्या. प्राप्त पाच निविदांपैकी सर्वाधिक बोली नमुद करणाºयाला सदर साहित्य विकण्यात आले असल्याचे न.प. अधिकाºयांनी सांगितले.
या भंगार विक्री प्रक्रियेत पाच इच्छुकांनी भाग घेतला होता. सुनील नारायण लोखंडे आर्वी यांनी ३ लाख १३ हजार, मोसीन स्ट्रील ट्रेडर्स नागपूर ३ लाख ११ हजार, फोर स्टार स्कॅप यवतमाळ ३ लाख ७ हजार तर एच.एन.ए. ट्रेडर्स नागपूर यांनी ३ लाख १५ हजाराची बोली नमुद केली होती. सर्वाधिक बोली नमुद केल्याने एच.एन.ए. ट्रेडर्स नागपूर यांना पालिकेच्यावतीने भंगार विक्री करण्यात आले आहे. सदर भंगार विक्रीतून पालिकेला ३ लाख ५ हजारांची मिळकत मिळेल असा अंदाज होता;पण प्रत्यक्ष लिलावादरम्यान दहा हजार रुपये जादाचे मिळाले आहे, हे उल्लेखनिय.
सा.बां.विभागाकडून करून घेतले व्हॅल्यूवेशन
न.प.च्या मालकीचे असलेले व उपयोगात न येणारे विविध साहित्य भंगारात टाकून विकल्यास त्याची किती रक्कम मिळावयाला पाहिजे याचे व्हॅल्यूवेशन न.प. अधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेतले. ३ लाख ५ हजार रुपये सदर साहित्याचे मिळेल असा अहवाल सा.बा.विभागाच्या अधिकाºयांनी न.प.ला दिला होता. मात्र, प्रत्यक्ष लिलावादरम्यान न.प.ला १० हजार जास्त प्राप्त झाले आहे.
९० कंटेनरसह विविध साहित्याची विक्री
न.प.च्या कुठल्याही कामात न येणाºया व धुळखात पडून असलेल्या काही साहित्याची वर्धा न.प.ने यंदा विक्री केली आहे. यात मोडके कचºयाचे ९० कंटेनर, २ छोटी कचरा ट्रॉली, ३ पाणी टॅक, २ ट्रॉली व रस्ता दुभाजकावर लावण्यात आलेली १ टन वजनाची जुन्या जाळीचा समावेश आहे.
२००८-०९ मध्ये मिळाले होते लाख रुपये
वर्धा नगर परिषदेने २००८-०९ मध्ये यापूर्वी भंगार विक्री केली होती. त्यावेळी विविध साहित्य विक्रीतून नगर पालिकेला सुमारे १ लाख रुपये प्राप्त झाले होते, असे न.प.अधिकाºयांनी सांगितले.
वाहन विक्रीतून ५.८३ लाख
वर्धा न.प.ने भंगार झालेल्या व त्यांच्याकडे धुळखात पडून असलेल्या चार ट्रकसह एक अग्निशमनबंवाची रितसर निविदा बोलावून ५ लाख ६३ हजारात विक्री केली. या लिलाव निविदा प्रक्रियेत एकूण २९ इच्छुक सहभागी झाले होते. सदर भंगार वाहनांचे व्हॅल्यूवेशन उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले होते. १ लाख ६३ हजार न.प.ला मिळावे असा अहवाल उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला होता. पण, प्रत्यक्ष लिलावादरम्यान सदर भंगार गाड्यांची ५ लाख ६३ हजारात विक्री झाल्याचे न.प. अधिकाºयांनी सांगितले.