भंगारातून पालिकेला ३.१५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:31 PM2018-02-28T23:31:46+5:302018-02-28T23:31:46+5:30

भंगार विक्रीतून वर्धा नगर परिषदेने ३.१५ लाखांची कमाई केली आहे. सदर भंगार विक्रीकरिता पालिकेने आॅनलाईन पद्धतीने निविदा मागविल्या होत्या. प्राप्त पाच निविदांपैकी सर्वाधिक बोली लावणाऱ्यास सदर साहित्य विकण्यात आल्याचे न.प. अधिकाऱ्यांनी सांगितले.

3.15 lakhs of piglets | भंगारातून पालिकेला ३.१५ लाख

भंगारातून पालिकेला ३.१५ लाख

Next
ठळक मुद्देआॅनलाईन प्रक्रियेतून निविदा : अहवालापेक्षा दहा हजार मिळाले अधिक

महेश सायखेडे।
ऑनलाईन लोकमत
वर्धा : भंगार विक्रीतून वर्धा नगर परिषदेने ३.१५ लाखांची कमाई केली आहे. सदर भंगार विक्रीकरिता पालिकेने आॅनलाईन पद्धतीने निविदा मागविल्या होत्या. प्राप्त पाच निविदांपैकी सर्वाधिक बोली लावणाऱ्यास सदर साहित्य विकण्यात आल्याचे न.प. अधिकाऱ्यांनी सांगितले.
भंगार विक्री प्रक्रियेत पाच इच्छुकांनी भाग घेतला होता. सुनील नारायण लोखंडे आर्वी यांनी ३ लाख १३ हजार, मोसीन स्ट्रील ट्रेडर्स नागपूर ३ लाख ११ हजार, फोर स्टार स्क्रॅप यवतमाळ ३ लाख ७ हजार तर एच.एन.ए. ट्रेडर्स नागपूर यांनी ३ लाख १५ हजरांची बोली नमूद केली होती. सर्वाधिक बोली नमूद केल्याने एच.एन.ए. ट्रेडर्स नागपूर यांना पालिकेच्यावतीने भंगार विक्री करण्यात आली आहे. सदर भंगार विक्रीतून नगर पालिकेला ३ लाख ५ हजार रुपयांची मिळकत मिळेल, असा अंदाज होता; पण प्रत्यक्ष लिलावादरम्यान दहा हजार रुपये अधिक मिळाल्याचेही पालिकेद्वारे सांगण्यात आले.
वाहन विक्रीतून ५ लाख ८३ हजारांची मिळकत
वर्धा न.प.ने भंगार झालेल्या व त्यांच्याकडे धूळखात पडून असलेल्या चार ट्रकसह एक अग्निशमन बंबाची रीतसर निविदा बोलवून ५ लाख ६३ हजारांत विक्री केली. या लिलाव निविदा प्रक्रियेत एकूण २९ इच्छुक सहभागी झाले होते. सदर भंगार वाहनांचे मूल्यांकन उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले होते. १ लाख ६३ हजार न.प.ला मिळावे, असा अहवाल उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला होता; पण प्रत्यक्ष लिलावादरम्यान सदर भंगार गाड्यांची ५ लाख ६३ हजारांत विक्री झाल्याचे न.प. अधिकाºयांनी सांगितले.
यापूर्वी मिळाले १ लाख
वर्धा न.प. ने २००८-०९ मध्ये यापूर्वी भंगार विक्री केली होती. त्यावेळी साहित्य विक्रीतून नगर पालिकेला १ लाख रुपये प्राप्त झाले होते, असे सांगण्यात आले.
९० कंटेनरसह विविध साहित्याची विक्री
पालिकेच्या कामात न येणाºया व धूळखात पडून असलेल्या काही साहित्याची न.प. ने यंदा विक्री केली. यात मोडके कचऱ्याचे ९० कंटेनर, दोन लहान कचरा ट्रॉली, तीन वॉटर टँक, दोन ट्रॉली आणि रस्ता दुभाजकावर लावण्यात आलेली १ टन वजनाच्या जुन्या जाळीचा समावेश आहे. या संपूर्ण साहित्याची मूल्यमापन करून विक्री करण्यात आली आहे.

बांधकाम विभागाकडून केले मूल्यांकन
नगर परिषदेच्या मालकीचे असलेले आणि उपयोगात येणार नसलेले विविध साहित्य भंगारात टाकून विकल्यास त्याची किती रक्कम मिळायला पाहिजे याचे मूल्यांकन न.प. अधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेतले. ३ लाख ५ हजार रुपये सदर साहित्याचे मिळतील, असा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी पालिकेला दिला होता; पण प्रत्यक्षात लिलावानंतर पालिकेला १० हजार अधिक प्राप्त झालेत.

Web Title: 3.15 lakhs of piglets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.