शिबिरात ३२ शिक्षकांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:12 AM2017-10-09T00:12:57+5:302017-10-09T00:13:08+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा, देवळी व सेलू तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात ३२ शिक्षकांनी रक्तदान केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा, देवळी व सेलू तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात ३२ शिक्षकांनी रक्तदान केले. गत १२ वर्षात सदर उपक्रमाच्या माध्यमातून ५४४ रक्तपिशव्या संकलन झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जि.प.च्या सभागृहात पार पडलेल्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी जि. प. अध्यक्ष नितीन मडावी, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती जयश्री गफाट, पं. स. सभापती महानंदा ताकसांडे, विस्तार अधिकारी सुरेश हजारे, सेवाग्राम येथील वैद्यकीय अधिकारी किरण मेहरा, शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीचे निमंत्रित सदस्य विजय कोंबे, जिल्हाध्यक्ष नरेंद्र गाडेकर, जिल्हा सरचिटणीस रामदास खेकारे, जिल्हा कार्याध्यक्ष अजय काकडे, मनोहर डाखोळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शिबिरात विस्तार अधिकारी सुरेश हजारे यांच्यासह एकूण ३२ शिक्षकांनी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. याप्रसंगी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने कार्य करणाºया देवळी पं.स.अंतर्गत येणाºया दिघी (बो.) शाळेच्या शिक्षिका अर्चना गिरी, सेलू पं.स.तील खापरी शाळेचे शिक्षक संजय देवळीकर, सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले केंद्र प्रमुख रवींद्र राठोड, शिक्षक रवींद्र लवणे, रुपसिंग राठोड तसेच राष्ट्रीय पातळीवर कराटे या क्रीडा स्पर्धेत कास्य पदक पटकाविणाºया आर्या मनीष ठाकरे हिचा मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देहदानाचा संकल्प करणारे कृष्णराव भोयर याचा सत्कार जि. प. अध्यक्ष नितीन मडावी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेला देशपातळीवर स्वच्छतेसाठीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष नितीन मडावी, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांचा आणि शालेय स्वच्छता स्पर्धा आयोजित करून त्यासाठी एक लाख रुपयांच्या पारितोषिकांचा निर्णय घेतल्याबद्दल शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापती जयश्री गफाट यांनाही सन्मानित करण्यात आले. संचालन रवींद्र पावडे यांनी केले.