भोंग्यावरून तापलं वातावरण; वर्धा प्रशासन अलर्ट मोडवर, ३२० गुन्हेगार ७ दिवसांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 03:44 PM2022-04-29T15:44:09+5:302022-04-29T15:58:26+5:30

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरुन राजकीय वातावरणात भूकंप आलेला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे.

320 criminals deported from Wardha district; Police action to carry out upcoming festivals and celebrations in peace | भोंग्यावरून तापलं वातावरण; वर्धा प्रशासन अलर्ट मोडवर, ३२० गुन्हेगार ७ दिवसांसाठी हद्दपार

भोंग्यावरून तापलं वातावरण; वर्धा प्रशासन अलर्ट मोडवर, ३२० गुन्हेगार ७ दिवसांसाठी हद्दपार

googlenewsNext
ठळक मुद्देआगामी सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांची कारवाई पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर, सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

वर्धा : धार्मिक स्थळांवरील भाेंग्यावरुन राजकीय वातावरण तापत चालले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून धार्मिक स्थळांवरील भोंग्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. आगामी सण, उत्सव काळादरम्यान शहरासह जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने जिल्ह्यातील तब्बल ३२० सराईत गुन्हेगारांना वर्धा जिल्ह्यातून ७ दिवसांसाठी तडीपार केल्याची माहिती आहे.

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरुन राजकीय वातावरणात भूकंप आलेला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यातील ठाणेदारांना पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांनी मार्गदर्शन करुन तशा सूचनाही देण्यात आलेल्या असल्याची माहिती आहे. मागील वर्षी पोलीस विभागाने २०० गुन्हेगारांना हद्दपार केले होते. आगामी रमजान ईद या सणानिमित्त सामाजिक शांतता धोक्यात येऊ नये, म्हणून पोलीस विभागाने तब्बल ३२० सराईत गुन्हेगारांच्या हद्दपारीचे आदेश उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठविले होते. उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी गुन्हेगारांना १ ते ७ मे या सात दिवसांसाठी हद्दपार केले आहे.

अटकेची तरतूद..

कलम १४४ या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्या व्यक्तीला पोलीस अटक करु शकतात. कलम १०७ किंवा कलम १५१ अन्वये अटक करता येते. कलम १४४ नुसार वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.

सायबर पोलिसांचाही ‘वॉच’

भोंगे वाजविण्यावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर सायबर सेल लक्ष ठेवून आहे. कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन देखील सायबर सेलमधील पोलिसांकडून करण्यात आले आहे.

उपविभागनिहाय करण्यात आलेली हद्दपारीची कारवाई

उपविभाग हद्दपार आरोपी

वर्धा             ११०

हिंगणघाट ९०

आर्वी             ६०

पुलगाव             ६०

रेकॉर्डवरील गुन्हेगार ‘रडार’वर

सामाजिक शांतता भंग होऊ नये, म्हणून पोलीस विभागाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलित करुन त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात येतो. उपविभागीय महसूल अधिकारी त्या प्रस्तावांची पडताळणी करुन जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देतात.

जिल्ह्यात सामाजिक शांतता भंग होऊ नये, तसेच सण उत्सव काळात गालबोट लागू नये, म्हणून जिल्ह्यातील ३२० गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. नागरिकांनी आगामी सण, उत्सव काळात शांतता टिकवून ठेवावी, तसेच पोलिसांना सहकार्य करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

-यशवंत सोळंकी, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा.

 

Web Title: 320 criminals deported from Wardha district; Police action to carry out upcoming festivals and celebrations in peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.