३२ ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुका
By Admin | Published: May 12, 2014 12:06 AM2014-05-12T00:06:40+5:302014-05-12T00:06:40+5:30
तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदासाठी १५ ते २४ मे दरम्यान निवडणूक होत आहे. यामुळे ग्रामपंचायतीवर आपलाच सरपंच असावा,
घोराड : तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदासाठी १५ ते २४ मे दरम्यान निवडणूक होत आहे. यामुळे ग्रामपंचायतीवर आपलाच सरपंच असावा, यासाठी गावपातळीवरील राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तालुक्यातील ३२ ग्रा़पं़ मध्ये सालई (कला), धानोली (मेघे), झडशी, जुनगढ, खडका या ग्रा़पं़ मध्ये सरपंच पद नामाप्रकरिता राखीव आहे. खैरी (क़), सेलडोह, सुकळी (बाई), वडगाव (खुुर्द), कोटंबा, पिंपळगाव, चाणकी या ग्रा़पं़ मध्ये सरपंचपद सर्वसाधारण गटाकरिता राखीव आहे. बोरी (को़) व टाकळी (झ.) येथील सरपंचपद अनुसूचित जातीकरिता राखीव तर दिग्रस, वाहितपुर, जुनोना, कोल्हापूर येथील सरपंचपद अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे. येंकापूर, सुरगाव, दहेगाव, देऊळगाव, अनुसूचित जमाती महिलेकरिता राखीव आहे. केळझर, वडगाव (कला) रेहकी, हमदापूर, वडगाव (जंगली), नानबर्डी, सोेंडी या ग्रामपंचायती सर्वसाधारण स्त्री उमेदवाराकरिता राखीव आहे तर घोराड, तळोदी, पळसगाव (बाई) येथे नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला सरपंचपदी विराजमान होणार आहे. तहसील कार्यालयामार्फत सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत़ आता गावपातळीवर राजकीय नेते आपला झेंडा रोवण्याकरिता मोर्चेबांधणी करीत असल्याचे दिसते़(वार्ताहर)