पहिल्या दिवशी ३३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:00 AM2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:00:28+5:30
आजपासून ११ विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. याकरिता विभागनिहाय वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. त्यानुसार आज सामान्य प्रशासन, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, वित्त व लघुसिंचन विभागातील कर्मचाºयांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. पण, काही इतरही विभागाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांच्या ऑफलाईन पद्धतीने प्रशासकीय, विनंती व समानिकरण बदल्यांच्या प्रक्रियेला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. तीन दिवस चालणाऱ्या या बदली प्रक्रि येच्या पहिल्या दिवशी पाच विभागातील ३३ कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या.
जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सकाळी ११ वाजतापासून बदली प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, महिला व बालकल्याण सभापती सरस्वती मडावी, शिक्षण व आरोग्य समिती सभापती मृणाल माटे, कृषी व पशुसंवर्धन सभापती माधव चंदनखेडे, समाजकल्याण सभापती विजय आगलावे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
बदल्यांकरिता सभागृहामध्ये नियोजनपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत पहिल्या दिवशीची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली. यासर्व बदली प्रक्रियेचे चित्रीकरण केले जात आहे.
सभागृहाबाहेर कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा
आजपासून ११ विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. याकरिता विभागनिहाय वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. त्यानुसार आज सामान्य प्रशासन, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, वित्त व लघुसिंचन विभागातील कर्मचाºयांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. पण, काही इतरही विभागाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यामुळे सभागृहाबाहेर गर्दी जमली होती. तेथील सुरक्षा रक्षक वारंवार सोशल डिंस्टंन्सिग ठेवण्यास सांगत होते पण, याकडे दुर्लक्ष करीत कर्मचारी घोळक्याने उभे राहून बेशिस्तीचे दर्शन घडवित होते. त्यामुळे पुढे तरी या प्रकाराला आळा घालण्याची गरज आहे.