३३ ग्रामपंचायती झाल्या १०० टक्के हागणदारीमुक्त
By admin | Published: September 13, 2016 01:24 AM2016-09-13T01:24:12+5:302016-09-13T01:24:12+5:30
गावांतील आरोग्य कायम टिकून राहावे आणि महिलांच्या सुरक्षित धोरणाचा भाग म्हणून राज्य
आष्टी (शहीद) : गावांतील आरोग्य कायम टिकून राहावे आणि महिलांच्या सुरक्षित धोरणाचा भाग म्हणून राज्य शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम सुरू केले. यासाठी १२ हजार रुपये प्रती लाभार्थी अनुदान दिले. जिल्हास्तरीय पथकाद्वारे याची पाहणी करण्यात आली. यात तालुक्यात आजपर्यंत ३३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्याचे आढळून आले.
जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक मेश्राम, पं.स. गटविकास अधिकारी अनिल गावंडे, विस्तार अधिकारी पंचायत कैलास वानखडे, विस्तार अधिकारी सांख्यिकी पी.एस. चव्हाण, जिल्हा प्रकल्प समन्वयक सचिन खाडे, पं.स. सभापती अर्चना राहाटे, पं.स. सदस्य विजय वांगे, दुर्गानंद डोळस, माधूरी बुले, सरपंच सुनीता जोरे तळेगाव, वनीता केवटे थार, वनीता लवणकर साहुर, तारा खुवशे माणिकवाडा, धुर्वे किन्हाळा, ग्रामविकास अधिकारी शिवदास रेवस्कर, विनोद राठोड, रमेश सावरकर, चेतन मुंढे, प्रियंका राऊत आदी उपस्थित होते. यावेळी गावांत गृहभेटी देत शाळांमध्ये मुलांना शौचालयावर मार्गदर्शन करण्यात आले. उघड्यावर शौचास बसणे, घाण करणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत कुणी तक्रार केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ (कखग), ११७ अंतर्गत अपराध सिद्धीनंतर १२०० रुपये दंड व कारावासाची शिक्षा होणार असल्याची माहिती तपासणी पथकाचे प्रमुख मेश्राम यांनी दिली.
आष्टी तालुक्यातील ४१ पैकी ३१ ग्रामपंचायती १०० टक्के पूर्ण झाल्या. २ ग्रामपंचायती आॅफलाईन असून ३३ गावे हागणदारीमुक्त आहे. उर्वरित ८ गावे महिनाभरात उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. गृहभेटीमध्ये शासनाने प्रकाशित केलेल्या तीनही स्टीकरची अंमलबजावणी करण्यात आली. यात शौचालय बांधकाम पूर्ण झाले, अशा लाभार्थ्यांच्या घरावर ‘लय भारी’चे हिरवे स्टिकर, शौचालय बांधकाम केले; पण वापर केला नाही, अशांना ‘जरा जपून’चे पिवळे तर ज्यांनी शौचालय बांधकामाला सुरूवातच केली नाही, अशांच्या घरावर ‘खतरा/धोका’ नावाचे लाल स्टिकर लावण्यात आले. घरोघरी स्टिकर लावल्याने गावात चर्चेचा विषय रंगला होता.(तालुका प्रतिनिधी)
अनुदानानंतर जागृतीची गरज
४शासनाने शौचालय बांधकामासाठी प्रती लाभार्थी बारा हजार रुपयांचे अनुदान दिले. असे असताना बांधकामासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागत असून गृहभेटी देत जनजागृतीद्वारे लोकांना प्रोत्साहीत करावे लागत आहे.
४आष्टी तालुक्यातील ३३ ग्रामपंचायती १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याबद्दल गटविकास अधिकारी अनिल गावंडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पंचायत समिती कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थित होते.