अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हवे ३४५.९९ कोटी; २.५४ लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान

By महेश सायखेडे | Published: September 6, 2022 04:40 PM2022-09-06T16:40:55+5:302022-09-06T16:41:09+5:30

जिल्हा प्रशासनाने पाठविला शासनाला प्रस्ताव

345.99 crores of fund required for farmers affected by excessive rainfall; More than 33 percent loss of crops on 2.54 lakh hectares | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हवे ३४५.९९ कोटी; २.५४ लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हवे ३४५.९९ कोटी; २.५४ लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान

googlenewsNext

वर्धा : यंदाच्या वर्षी जून महिन्यांत पावसाने दडी मारली. पण जुलै अन् ऑगस्ट महिन्यांत सैराट झालेल्या वरुणराजाची वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात कोसळधार कायम राहिल्याने जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांत अतिवृष्टीची वेळोवेळी नोंद घेण्यात आली. याच अतिवृष्टीमुळे २.५४ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीवरील उभ्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे सर्वेक्षण व पंचनाम्यांअंती पुढे आले आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या २ लाख ३२ हजार ६४६ इतकी असून त्यांना नियमानुसार शासकीय मदत देण्यासाठी ३४५.९९ कोटींची गरज असून तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे. आता शासनाकडून निधी केव्हा वितरित होतो याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतकरी समुद्रपूर तालुक्यात

वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण २ लाख ३२ हजार ६४६ शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात वर्धा तालुक्यातील ३३ हजार ११, सेलू तालुक्यातील २७ हजार ३८६, देवळी तालुक्यातील ३० हजार ३४९, आर्वी तालुक्यातील २६ हजार ३९८, आष्टी तालुक्यातील १७ हजार ३८७, कारंजा तालुक्यातील २४ हजार ३, हिंगणघाट तालुक्यातील ३६ हजार ५३३ तर समुद्रपूर तालुक्यातील ३७ हजार ५७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

हिंगणघाट तालुक्यातील उभ्या पिकांचे सर्वाधिक नुकसान

जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत जिल्ह्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण २ लाख ५४ हजार ९४.४० हेक्टरवरील उभ्या पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात वर्धा तालुक्यातील ४०६९३.३३ हेक्टर, सेलू तालुक्यातील २३९६३.७० हेक्टर, देवळी तालुक्यातील ३७२९३.६० हेक्टर, आर्वी तालुक्यातील ३००७५.७७ हेक्टर, आष्टी तालुक्यातील १५०५५ हेक्टर, कारंजा तालुक्यातील २६३४३.३८ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यातील ४५५८७.५२ हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यातील ३५०८२.१० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

वाढीव दराप्रमाणे अपेक्षित तालुकानिहाय निधी
वर्धा : ५५,५०,३७,२८८ रुपये
सेलू : ३२,६०,५७,२९६ रुपये
देवळी : ५०,७२,२८,८०० रुपये
आर्वी : ४१,०१,४२,०९२ रुपये
आष्टी : २०,५२,८५,६०० रुपये
कारंजा : ३५,८२,६९,९६८ रुपये
हिंगणघाट : ६२,०८,२१,७४४ रुपये
समुद्रपूर : ४७,७१,१६,५६० रुपये   

Web Title: 345.99 crores of fund required for farmers affected by excessive rainfall; More than 33 percent loss of crops on 2.54 lakh hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.