३५ वृत्तपत्र वितरकांना मिळाला रेनकोटचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:11 AM2017-07-25T01:11:55+5:302017-07-25T01:11:55+5:30
मदत फाऊंडेशनच्यावतीने वृत्तपत्र वितरक मुलांना रेनकोट, प्रत्येक शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना ठाणेदार चौधरी यांच्या सौजन्याने गणवेश....
मदतचा उपक्रम : २५ विद्यार्थ्यांना गणवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : मदत फाऊंडेशनच्यावतीने वृत्तपत्र वितरक मुलांना रेनकोट, प्रत्येक शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना ठाणेदार चौधरी यांच्या सौजन्याने गणवेश तथा दिव्यांगांना रिक्षा सायकलकरिता दोन ट्युब व टायर वाटपाचा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. स्थानिक गुरूजी मठात रविवारी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ता मेघे आयुर्वेदिक संस्थानचे डीन डॉ. श्यामसुंदर भुतडा तर अतिथी म्हणून ठाणेदार अशोक चौधरी, ‘सक्षम’ संघटनेचे विदर्भ अध्यक्ष नंदभाऊ नरोटे, महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघाचे राज्याध्यक्ष सुनील पाटणकर, मदत धर्मार्थ दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मोहोड, मदतचे अध्यक्ष अनिल जोशी, सचिव प्रा. मोरेश्वर उपाध्यक्ष, डॉ. अनिता भुतडा, लक्ष्मीकांत साखरे आदी उपस्थित होते.
मदत फाऊंडेशनने वर्षभरात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्याचाच एक भाग म्हणून राबविलेला आजचा हा कार्यक्रम आहे. समाजात अनेक संस्था काम करतात; पण मदतचे काम आगळेच आहे. समाजातील अत्यंत गरजू घटकांसाठी ते सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. कार्यक्रमाची कल्पकता प्रत्येक वेळी नाविन्यपूर्णच असते, असे सांगितले.
प्रास्ताविक मदतचे प्रा. नितीन बोडखे यांनी केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांची यथोचित मार्गदर्शन केले. यावेळी शहरातील सर्व वृत्तपत्र घरोघरी वाटणाऱ्या ३५ मुलांना रेनकोट, सर्व शाळांतील २५ गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व ५ रिक्शा सायकल चालह दिव्यांगांना दोन टायर, ट्युबचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन मदतचे निलय जोशी यांनी केले तर आभार दिवाकर भेदरकर यांनी मानले.
कार्यक्रमाला श्याम काळे, कैसर अंसारी, विजय अजमिरे, अरुण ढोक, अरुण मानकर, जितेंद्र पाटणी, नितीन ढोबळे, देविदास साठे, प्रणित लोखंडे, अण्णा थूल, अरुण भालेराव, सुनील पारसे, शुभांगी भेदरकर, कविता जोशी, संगिता आपकाजे, गोठाने, डॉ. शुभांगी थोरात, पारसे आदी उपस्थित होते.