अनुदानावर ३,५०० क्विंटल सोयाबीन बियाणे

By admin | Published: June 30, 2017 01:42 AM2017-06-30T01:42:06+5:302017-06-30T01:42:06+5:30

शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानंतर्ग अनुदानावर बियाणे देण्यात येतात.

3,500 quintals of soybean seeds on subsidy | अनुदानावर ३,५०० क्विंटल सोयाबीन बियाणे

अनुदानावर ३,५०० क्विंटल सोयाबीन बियाणे

Next

महाबीजकडून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी : काही कृषी केंद्रांवर अनागोंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानंतर्ग अनुदानावर बियाणे देण्यात येतात. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांकरिता एकूण ३ हजार ५०० क्विंटल बियाणे अनुदानावर देण्याचा निर्णय झाला आहे. याचा लाभ साधारणत: ११ हजार ६६६ शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.
गत आठवड्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना ब्रेक दिला होता. केवळ कपाशीची लागवड होत होती. या आठवड्यात पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांकरिता लगबग सुरू केली आहे. शासनाच्यावतीने देण्यात येत असलेल्या अनुदानित बियाण्यांकरिता काही भागांत कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांना अनुदानीत बियाणे देण्यास टाळटाळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. तर आर्वी तालुक्यात महाबीजच्या बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे म्हणत काही शेतकऱ्यांनी बियाणे परत केल्याचा प्रकार घडला आहे.
बियाणे पुरविण्याची जबादारी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम आणि कृभको यांना देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने शेतकऱ्यांकडून सोयाबीनसह इतर पिकांचा पेरा सुरू आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची निवड तालुका स्तरावरच होत असल्याचे दिसून आले आहे.

महाबीजने पुरविले केवळ १,२०० क्विंटल बियाणे
शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येत असल्या बियाण्यांची पुर्तता करण्याकरिता महाबीजला २ हजार ८०० क्विंटल बियाणे पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली. असे असताना त्यांच्याकडून केवळ १ हजार २०० क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. तर राष्ट्रीय बीज निगमला ३५० आणि कृभकोला ३५० क्विंटल बियाणे पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
बियाण्यांवर २५ टक्के सूट
शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेत शेतकऱ्यांना बियाण्यांवर २५ टक्के सूट देण्यात असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. शासकीय बियाणे घेण्याकरिता तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची चांगलीच गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे

जिल्ह्याच्या कृषी विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या सूचनेनुसार बियाणे पुरविण्यात येत आहे. आतापर्यंत १ हजार २०० क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. कंपनीकडे बियाण्यांचा तुटवडा नाही. कृषी विभागाने सुचना केल्यास आणखी बियाणे पुरविण्यात येईल.
- अजय फुलझले, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज वर्धा.

अनुदानावर बियाणे देण्याच्या सूचना निवड करण्यात आलेल्या कृषी केंद्र चालकांना देण्यात आल्या आहेत. यात कुठे बियाणे देण्यास टाळाटाळ होत असल्याची ओरड नाही. तसे असल्यास शेतकऱ्यांनी थेट कृषी कार्यालयात संपर्क साधावा.
- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

Web Title: 3,500 quintals of soybean seeds on subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.