सात महिन्यांत ३६३ नागरिकांना ‘स्रेकबाईट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 06:00 AM2019-12-11T06:00:00+5:302019-12-11T06:00:04+5:30

शेतीची कामे करताना सर्पदंश होण्याची शक्यता अधिक असते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बिनविषारी साप आहेत. तर विषारी सापांची संख्याही बऱ्यापैकी आहे. साप चावल्यानंतर उपचार म्हणून प्रतिबंधक लस दिली जाते. वाढत्या घटना लक्षात घेता सर्वच केंद्रांवर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

363 citizens 'snakebait' in seven months | सात महिन्यांत ३६३ नागरिकांना ‘स्रेकबाईट’

सात महिन्यांत ३६३ नागरिकांना ‘स्रेकबाईट’

Next
ठळक मुद्देशेतीची कामे करताना दक्षता घेणे गरजेचे

चैतन्य जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळ्यात शेतीची कामे करताना सर्पदंशाच्या घटना घडतात. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल ३६३ नागरिकांंना सर्पदंश झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना शेतीची कामे करताना घडल्या असल्याने शेतमजुरांसह शेतकऱ्यांनी दक्ष राहूनच शेतीची विविध कामे करणे गरजेचे आहे.
सर्पदंश प्रतिबंधक लसींची उपलब्धता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सुमारे दहा हजार लस उपलब्ध आहे. मात्र, लसींचा वापर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याचा सल्ला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. शेतीची कामे करताना सर्पदंश होण्याची शक्यता अधिक असते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बिनविषारी साप आहेत. तर विषारी सापांची संख्याही बऱ्यापैकी आहे. साप चावल्यानंतर उपचार म्हणून प्रतिबंधक लस दिली जाते. वाढत्या घटना लक्षात घेता सर्वच केंद्रांवर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णांना लसीसाठी खासगी रुग्णालयात पैसे मोजावे लागतात; पण शासकीय रुग्णालयांमध्ये ही लस नि:शुल्क दिली जात असल्याचे सांगण्यात आले.

लस संपल्यास तात्काळ उपलब्ध
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध आहे. प्रत्येक आरोग्य केंद्राकडून जेवढी मागणी असेल तेवढ्या लसींचा साठा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जात आहे. सर्पदंश झालेला एखादा रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला सर्व लस देण्यात आल्यावर संबंधितांकडे लसीची मागणी करण्यात येते. त्यानंतर त्वरित लस पुरविण्यात येत.

लस असते; पण डॉक्टर नसतात!
प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, डॉक्टरच वेळेवर हजर राहत नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे बहुधा खासगी डॉक्टरांचा आधार नागरिकांना घ्यावा लागतो. समस्या लक्षात घेता आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीने योग्य कारवाईची गरज आहे.

सध्या शेतीची कामे सुरू असल्याने सर्पदंशाच्या घटना घडत आहेत. सर्पदंशाची लस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. सर्पदंश झाल्यावर रुग्णाला तत्काळ नजीकच्या रूग्णालयात न्यावे. शिवाय औषधोपचार घ्यावा.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

Web Title: 363 citizens 'snakebait' in seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :snakeसाप