3,70,807 नागरिकांनी मतदान कार्डसोबत लिंक केले आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 10:50 PM2022-09-16T22:50:33+5:302022-09-16T22:58:08+5:30

मोबाईलच्या प्ले स्टोरमधून वोटर हेल्पलाईन हे ॲप डाऊनलोड करावे. त्यानंतर वोटर रजिस्ट्रेशनला क्लिक करा. फार्म ६ बीला क्लिक करावे. लेट्स स्टार्टवर क्लिक केल्यावर आपला मोबाईल नंबर नमूद करावा. त्यानंतर प्राप्त होणारा ओटीपी नमूद करून व्हेरिफायवर क्लिक करावे. व्हेरिफाय आयडी टाकल्यावर महाराष्ट्र राज्याची निवड करून प्रोसिडवर क्लिक करावे. त्यानंतर आधार नंबर टाकून डनवर क्लिक करून कनफर्मवर क्लिक करावे. विशेष म्हणजे नागरिकांना घर बसल्या मोबाईलचा वापर करून ही प्रक्रिया करता येते.

3,70,807 citizens linked Aadhaar with voter card | 3,70,807 नागरिकांनी मतदान कार्डसोबत लिंक केले आधार

3,70,807 नागरिकांनी मतदान कार्डसोबत लिंक केले आधार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारत निवडणूक आयोगाने प्रत्येकाचे मतदान ओळखपत्र आधारकार्ड सोबत संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मतदान ओळखपत्र आधारकार्डशी जोडण्यासाठीची मोहीम १ ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. याच माेहिमेंतर्गत मागील दीड महिन्यात जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ७० हजार ८०७ नागरिकांनी शासकीय उपक्रमाला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत मतदान कार्डसोबत आधारकार्डची जोडणी करुन घेतली आहे. अवघ्या दीड महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३३.७६ टक्के काम झाले असले तरी आगामी नवरात्री उत्सवात विविध ठिकाणी विशेष शिबिर घेऊन प्रभावी जनजागृतीही करण्यात येणार आहे. शिबिरांदरम्यान नागरिकांना ‘ऑन द स्पॉट’ मतदान कार्डसोबत आधार लिंक करता येणार आहे. एकूणच प्रभावी जनजागृतीसाठी निवडणूक विभागही सज्ज झाला आहे.

विशेष शिबिराला ३३,६७० नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद
- ११ सप्टेंबर या दिवशी वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांत विशेष शिबिर घेऊन मतदान कार्डसोबत आधार लिंक करण्यात आले. याच एक दिवसीय शिबिराला ३३ हजार ६७० नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत आपल्या मतदान कार्डसोबत आधार लिंक करून घेतले. या दिवशी आर्वी विधानसभा क्षेत्रात ७ हजार २६८, देवळी विधानसभा क्षेत्रात १० हजार १५८, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात ८ हजार २८८ आणि वर्धा विधानसभा क्षेत्रात ७ हजार ९५६ नागरिकांनी मतदान कार्डसोबत आधार कार्ड संलग्न करून घेतले.

आर्वी विधानसभा क्षेत्र प्रत्यक्ष कामात अव्वल
- मागील दीड महिन्यांत वर्धा जिल्ह्यात मतदान कार्डसोबत आधार लिंक करण्याचे ३३.७६ टक्के काम झाले आहे. सर्वाधिक काम आर्वी विधानसभा क्षेत्रात झाले असून, आर्वी विधानसभा क्षेत्रातील २ लाख ५४ हजार ६५८ मतदारांपैकी १ लाख १२ हजार १८२ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मतदान कार्डसोबत आधार लिंक करून घेतले आहे, तशी नोंदही निवडणूक विभागाने घेतली आहे.

मतदान कार्डसोबत आधार लिंक करणे सोपे
- मोबाईलच्या प्ले स्टोरमधून वोटर हेल्पलाईन हे ॲप डाऊनलोड करावे. त्यानंतर वोटर रजिस्ट्रेशनला क्लिक करा. फार्म ६ बीला क्लिक करावे. लेट्स स्टार्टवर क्लिक केल्यावर आपला मोबाईल नंबर नमूद करावा. त्यानंतर प्राप्त होणारा ओटीपी नमूद करून व्हेरिफायवर क्लिक करावे. व्हेरिफाय आयडी टाकल्यावर महाराष्ट्र राज्याची निवड करून प्रोसिडवर क्लिक करावे. त्यानंतर आधार नंबर टाकून डनवर क्लिक करून कनफर्मवर क्लिक करावे. विशेष म्हणजे नागरिकांना घर बसल्या मोबाईलचा वापर करून ही प्रक्रिया करता येते. एका ॲपवरून एकाच घरातील सहा व्यक्तींच्या मतदान कार्डसोबत आधार लिंक करता येते.

 

Web Title: 3,70,807 citizens linked Aadhaar with voter card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.