३८ हजार नागरिक आजारी

By Admin | Published: January 24, 2016 01:54 AM2016-01-24T01:54:11+5:302016-01-24T01:54:11+5:30

नागरिकांमध्ये आपल्या आरोग्यबाबत जागृती नाही, हे वास्तव आहे. आरोग्य जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात असतानाही ...

38 thousand citizens are sick | ३८ हजार नागरिक आजारी

३८ हजार नागरिक आजारी

googlenewsNext

आरोग्य जनजागृती अभाव : उच्च रक्तदाब, कर्करोग, लकव्याचा समावेश
गौरव देशमुख वर्धा
नागरिकांमध्ये आपल्या आरोग्यबाबत जागृती नाही, हे वास्तव आहे. आरोग्य जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात असतानाही जिल्ह्यातील ३८ हजार ५२१ नागरिक विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. यात उच्च रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग आणि लकव्याच्या आजाराचा समावेश आहे.
नागरिकांच्या आरोग्याबाबत माहिती घेण्याकरिता राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम २०११ मध्ये सुरू करण्यात आला. यात ९ लाख ४२ हजार ७७७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात वर्धा जिल्ह्यात २०११ ते २०१५ पर्यंत सुमारे ३६ हजार ६९६ (हायपर टेंशन) बीपीचे रुग्ण आढळून आले आहेत. हा आजार पुर्णत: अनुवांशिक नसला तरी थोडाफार अनुवांशिकता असणे नाकारता येत नाही. आरोग्य विभागामार्फत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध आजारांची मोफत तपासणी केली जाते.
१ एप्रिल ते ३० नोव्हेंबरपर्यंत उच्च रक्तदाबाचे १५ हजार ८४३ रुग्ण आढळून आलेत. यात ६ हजार ९८६ पुरूष तर ८ हजार ८५७ महिला रुग्ण असल्याचे समोर आले. हृदय व धमन्यांच्या आजारामध्ये ४४९ रुग्ण आढळून आलेत. यात पुरूष २१० तर महिला रुग्ण २३९ आहेत.
पक्षाघात (लकवा) या आजारात ५६७ रुग्ण आढळून आले आहे. यात पुरूष २८० तर महिला रुग्ण २८७ आहेत. कर्करोगामध्ये विविध प्रकार आहेत. महिलांच्या कर्करोगात स्तन, गर्भाशय, गर्भमुख व तोंडाचा कर्करोग आहे. कर्करोगाचे १४३ रुग्ण असून पुरूष ६२ तर ८१ महिला रुग्ण आहेत.
नागरिक धकाधकीच्या युगात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. हे आजार कायम स्वरूपी ठिक होत नसले तरी आटोक्यात अणण्याचा प्रयत्न करता येते. यासाठी आरोग्य विषयक जनजागृती गरजेची आहे.

चार वर्षांत ९.४२ लाख रुग्ण तपासणी
आॅगस्ट २०११ ते ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत ९ लाख ४२ हजार ७७७ नागरिकांच्या प्राथमिक तपासणीत ४ लाख १४ हजार ४३ पुरूषांची तर ५ लाख २८ हजार ७३४ महिलांची तपासणी करण्यात आली. यात उच्च रक्तदाबाचे ३६ हजार ६९६ रुग्ण असून १८ हजार ३६५ पुरूष व १८ हजार ३३१ महिला आहेत. हृदयरोग व धमन्यांचे आजार ८४२ रुग्ण असून ४७२ पुरूष व ३७० महिला आहेत. धकाधकीच्या युगात नागरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
तपासणीत उच्च रक्तदाबाचे संशयीत म्हणून ५० हजार ३ रुग्णांची, हृदयरोग व धमन्यांच्या आजारात संशयीत ८७५, लकवा या आजाराचे ७३० रुग्ण असून संशयीत ७८४ आहे. कर्करोगाचे २५३ रुग्ण असून संशयीत १ हजार ६१८ असल्याचे अहवालात नमूद आहे.

नागरिकांनी शासनामार्फत होणाऱ्या विविध शिबिरांचा लाभ घ्यावा. तपासणी करावी. हे रोग बरे होणारे नसले तरी यावर विशेष काळजी घेतली तर आटोक्यात आणता येतात. शारीरिक व्यायाम करणे गरजेचे आहे. जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे.
- डॉ. डी.जी. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. वर्धा.

अशा आजारांबाबत आमच्या विभागामार्फत औषधोपचार व तपासणी नि:शुल्क केली जाते. नागरिकांनी पुढाकार घेत वर्षातून एकदा तरी तपासणी करणे आवश्यक आहे.
- तृप्ती देशमुख (वरखेड), औषध निर्माण अधिकारी प्रा. आ.कें. मांडगाव

Web Title: 38 thousand citizens are sick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.