उत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडल्यामुळे 38 कामगार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 01:31 PM2021-02-03T13:31:11+5:302021-02-03T13:35:34+5:30

Fire : सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू

38 workers injured in hot ash blast at Uttam Galwa company | उत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडल्यामुळे 38 कामगार जखमी

उत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडल्यामुळे 38 कामगार जखमी

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची घटनास्थळी भेटसकाळी 5.30 वाजता फरनेस पूर्णपणे बंद झाल्यावर फरनेसमधील राख बाहेर काढण्यासाठी 50 कामगार काम करीत होते. 

वर्धा - वर्धा तालुक्याच्या भुगाव येथील  उत्तम गलवा स्टील प्लँटमध्ये आज सकाळी सुमारे 5.30 वाजताच्या सुमारास  एक अपघात  झाला. स्टील प्लँट वार्षिक देखभालीसाठी काल सायंकाळी बंद करण्यात आला होता. सकाळी 5.30 वाजता फरनेस पूर्णपणे बंद झाल्यावर फरनेसमधील राख बाहेर काढण्यासाठी 50 कामगार काम करीत होते. 

 

फरनेसमधील राख काढत असताना गरम हवेसोबत राखेचे कण एकदम अंगावर उडाल्यामुळे 38 लोक जखमी झालेत. यातील  28 व्यक्तींना सावंगी मेघे येथील विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर 10  व्यक्तींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कुणाचाही मृत्यू नाही. तसेच 40 टक्के भाजल्याच्या गंभीर जखमा असलेल्या  6 व्यक्तींना अति दक्षता केंद्रात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात भरती रुग्णांची विचारपूस करून रुग्णांनाच्या नातेवाईकांना धीर दिला.

खासदार रामदास तडस दिल्ली येथे अधिवेशनात असल्याने  SP आणि सावंगी ठाणेदार यांच्या  सोबत बोलणे झाले सदर घटनेची सर्व माहिती साहेबानी घेतली आणि जखमींवर चांगले उपचार करावे काळजी घ्यावी आणि सदर घटनेची वेवस्थित शहानिशा करावी असे बोलणे झाले.  तसेच भुगाव कंपनी वेवस्थापका सोबत सुद्धा बोलणे झाले जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च कंपनी मार्फत चांगल्या रुग्णालयात करावा आणि जखमींच्या घरच्यांना मदत करावी सांगण्यात आले.

Web Title: 38 workers injured in hot ash blast at Uttam Galwa company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.