४.३३ लाख वीज ग्राहकांना सुरक्षा ठेवीवर दिले ३.९४ कोटीचे व्याज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 05:46 PM2024-07-25T17:46:00+5:302024-07-25T17:48:14+5:30
'महावितरण'ची सुरक्षा ठेव : व्याज रकमेचे देयकातून होणार समायोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :वीज ग्राहकांना महावितरणकडे जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर लघुदाब वीज ग्राहकांना आर्थिक वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी व्याज देण्यात येते. त्यानुषंगाने वर्धा जिल्ह्यातील ४ लाख ३३ हजार ६०९ वीज ग्राहकांना ३ कोटी ९४ लाख ६ हजार ४८६ रुपयांचा व्याज परतावा देण्याचे निश्चित केले आहे.
व्याजाची ही रक्कम ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित करण्यात येत आहे. सुरक्षा ठेव म्हणजे काय, दरवर्षी ती का घेतली जाते, त्यावर व्याज मिळते काय, असे एक ना अनेक प्रश्न सामान्य वीज ग्राहकांना नेहमीच पडत असतात. मुळात वीज ग्राहकांकडून घेण्यात येत असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांच्या कल्याणासाठी वापरली रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी निश्चित केलेल्या दरानुसार व्याजही दिले जाते. ग्राहकांनी भरणा केलेल्या वीजबिलाच्या रकमेतूनच वीज खरेदी, वीजवहन आणि वितरण, देखभाल, दुरुस्ती खर्च भागविला जातो.
जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर महावितरणने निश्चित केलेले व्याज
विभाग लघुदाब ग्राहक संख्या निश्चित केलेले व्याज
आर्वी १,३०,५३८ १०,४४,००,१२,४८
हिंगणघाट ११,०८,९९ ९६,९९,४३९,४१
वर्धा १,९२,१७२ २,९२,६७,०३४,४४
विद्युत भार लक्षात घेऊन आकारली जाते सुरक्षा ठेव
महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सिंगल फेज, थ्री फेज ग्राहकांना विद्युत भार लक्षात घेऊन सुरक्षा ठेव आकारली जाते. वीज ग्राहकांसाठी मागील १२ महिन्याची वीजबिलाची सरासरी काढून एक महिन्याची रक्कम ही सुरक्षा ठेव म्हणून घेतली जाते. नवीन नियमावलीनुसार आता दोन महिन्यांची रक्कम ही सुरक्षा ठेव म्हणून घेण्यात येते.
सुरक्षा ठेव ही ग्राहकांचीच रक्कम
वितरण कंपनी वर्षातून एकदा ग्राहकांकडील सुरक्षा ठेवीचे पुनर्निधारण करू शकते. एखाद्या ग्राहकाची सुरक्षा ठेव ही त्याच्या आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरी रकमेपेक्षा कमी असेल तर संबंधित ग्राहकाला अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल देण्यात येते. वीजग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली तरी वीजदर आणि वीजवापर यामुळे वीजबिलाची रक्कम वाढली असेल तरच त्यातील फरकाच्या रकमेचे बिल म्हणून अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल दिले जाते. जमा असलेली सुरक्षा ठेच ही ग्राहकांचीच रक्कम असते.