४ लाख ९२ हजारांचा दारूसाठा कारसह जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:05 AM2017-10-06T00:05:38+5:302017-10-06T00:05:48+5:30

वर्धा शहरात दारू आणत असल्याची माहिती मिळाली. यावरून पवनार येथील पुलावर सापळा रचण्यात आला. यात ४.९२ लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.

4 lakh 92 thousand of the liquor seized with the car | ४ लाख ९२ हजारांचा दारूसाठा कारसह जप्त

४ लाख ९२ हजारांचा दारूसाठा कारसह जप्त

Next
ठळक मुद्देविशेष पथकाची कारवाई : दोन विक्रेत्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : वर्धा शहरात दारू आणत असल्याची माहिती मिळाली. यावरून पवनार येथील पुलावर सापळा रचण्यात आला. यात ४.९२ लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरूवारी अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली.
प्राप्त माहितीवरून विशेष पथकाने पवनार येथील पुलावर नाकाबंदी केली. यात शंकर दानानी हा चालक राजू गुंड याच्या मदतीने कार क्र. एमएच ३२ वाय २५१९ ने दारू आणत असल्याचे आढळले. यावरून शंकर दानानी रा. पोद्दार बगीचा व राजू गुंड रा. रामनगर यांना अटक करून कारसह ४ लाख ९२ हजार ४०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गजानन गिरी, दीपक वानखडे, विलास गमे, चंद्रकांत जीवतोडे, दिनेश तुमाने, रणजीत काकडे, योगेश चन्ने, तुषार भुते, पाचरे, घुमडे, तिजारे, वानखेडे, गोसावी, जांभुळकर आदींनी केली.
४ लाख २२ हजारांचा दारूसाठा जप्त
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सेलू, पुलगाव, सावंगी, रामनगर ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी छापे टाकून गावठी दारूसाठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी गावठी दारू, दारू गाळण्याचे साहित्य असा ४ लाख २२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात पोलिसांनी ११ दारूविक्रेत्यांना अटक केली. सावंगी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पारधी बेडा तसेच सेलू, पुलगाव व रामनगर ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील काही ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी गावठी दारू, उकळता मोह, रसायन सडवा, कच्चा मोह रसायन सडवा व दारू गाळण्याचे साहित्य असा ४ लाख २२ हजार ७५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात विशेष पथकातील अधिकारी, कर्मचाºयांनी केली.

Web Title: 4 lakh 92 thousand of the liquor seized with the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.