तीन गोदामांमधून ४ हजार ६३५ बॅग युरिया केला जप्त; रविवारी रात्री कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 04:53 PM2024-08-27T16:53:05+5:302024-08-27T16:53:54+5:30

Wardha : कृषी विभागाची कारवाई: गोदाम केले सील, 'टेक्निकल ग्रेड' युरियाची मोठ्या प्रमाणात साठेबाजी,

4 thousand 635 bags of urea seized from three godowns; Sunday night action | तीन गोदामांमधून ४ हजार ६३५ बॅग युरिया केला जप्त; रविवारी रात्री कारवाई

4 thousand 635 bags of urea seized from three godowns; Sunday night action

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात युरियाची साठेबाजी केली असल्याची माहिती मिळताच कृषी विभागाने रविवारी रात्री आर्ती आणि कारंजा तालुक्यात चौकशी केली. यादरम्यान त्यांना तीन गोदामांमध्ये 'टेक्निकल ग्रेड यूरिया, फॉर इंडस्ट्रीयल यूज ओन्ली असे लिहिलेल्या युरियाचा साठा आबकुळ आला. तिन्ही गोदामातून ४ हजार ६३५ बंग युरिया आढळून आल्याने गोदाम सील केले आहे. याप्रकरणी कृषी व्यावसायिकांत मोठी खळबळ उडाली आहे.


शेतीचा हंगाम सुरू असून, यात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. त्या अनुषंगाने कृषी विभागही अॅक्शन मोडवर आला आहे. अशातच त्यांना आर्वी व कारंजा घाडगे) तालुक्यातील काही ठिकाणी गोदामामध्ये युरियाची साठेबाजी केल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती, या माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारंजा तालुक्यातील राजणी येथील कोहली यांच्या गोदामाची तपासणी केली असता त्यात १ हजार १६० बैंग युरिया आढळून आला. त्यावर 'टेक्निकल ग्रेड यूरिया, फॉर इंडस्ट्रीयल यूज ओन्ली' असे लिहिलेले होते. त्यामुळे येथील युरियाचे नमुने घेऊन गोदाम सील केले. तसेच आर्वी तालुक्यातील बाजारवाड़ा येथील विजय वाजपेयी यांच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. या गोदामात अशाच प्रकारचा तब्बल २ हजार ३४२ बंग युरिया आढळून आला. येथीलही नमुने घेऊन गोदाम सील केले. यासोबतच याच तालुक्यातील पिंपळखुटा येथील अग्रवाल यांच्याही गोदामात १ हजार ११३ बॅग युरिया आढळून आला. त्यामुळे तिन्ही गोदाम सील करून युरियाचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले. कृषी विभागाने तिन्ही गोदामातून १२ लाख ३५ हजार २०० रुपयांच्या ४ हजार ६३५ बेंग युरिया अप्त करून तो स्थानिक पोलिसांत ठाण्याकडे सुपूर्द नाम्यावर ठेवला आहे. ही कारवाई पुण्यातील मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे, नागपूरचे तंत्र अधिकारी चंद्रेशेखर कोल्हे, आर्वीच्या तालुका कृषी अधिकारी वायवळ, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी प्रमोद पेटकर व आर्मी पंचायत समितीचे कृषी अधिकारी रवी दुबे यांनी केली. 


आगिक वसाहत नसताना साठेबाजी कशासाठी? 
कृषी विभागाने कारंजा आणि आर्वी तालुक्यातून एकाच दिवशी ४ हजार ६३५ बैंग युरिया जप्त केला आहे. या सर्व चुरियांच्या बेंगांवर 'टेक्निकल पेड युरिया, फॉर इंडस्ट्रीयल युज ओन्ली असे लिहिलेले आहेत, विशेषतः या दोन्ही तालुक्यात औद्योगिक वसाहत नाही किंवा कोणता मोठा उद्योगही नाही. असे असतानाही केवळ औद्योगिक वापरासाठी असलेल्या युरिवाची इतक्या मोठ्या प्रमाणात साठेबाजी कशासाठी, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.


औद्योगिक वापराचा युरिया शेतीसाठी? शेतीचे दिवस असल्याने सध्या शेतीकरिता युरिवाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशातच आर्वी व कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात फक्त औद्योगिक वापरासाठीच असलेला युरिया आढळून आला. त्यामुळे हा युरिया इतकाच होता की यापेक्षाही जास्त साठा होता. हा युरिया शेतीकरिता वापरला का? कुण्या शेतकऱ्यांना विकला का? हा साठा कशासाठी करण्यात आला, याचा उलगडा आता तपासणी अहवालानंतरच होईल.


"गोपनीय माहितीच्या आधारे कारंजा तालुक्यातील राजणी आणि आर्यों तालुक्यातील बाजारवाडा व पिंपळखुटा या तीन गुदामातून ४ हजार ६३५ बेंग युरिया जप्त करण्यात आला. या बॅगवर टेक्निकल ग्रेड युरिया, फॉर इंडस्ट्रीयल युज ओन्ली असे लिहिलेले आहेत. याचे नमुने घेऊन अमरावतीच्या प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल."
- संजय बमनोटे, कृषी विकास अधिकारी, जि.प., वर्धा.

Web Title: 4 thousand 635 bags of urea seized from three godowns; Sunday night action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.