४० टक्के अहिरवाडावासी बुडीत क्षेत्रातच
By Admin | Published: August 29, 2016 12:29 AM2016-08-29T00:29:49+5:302016-08-29T00:53:06+5:30
निम्न वर्धा प्रकल्पातील बुडीत ३१ गावांमध्ये अहिरवाडा गावाचा समावेश आहे. शासनाने अत्यल्प मोबदला दिल्याने गावातील ६० टक्के
जालना : गणेश विसर्जन मार्गावर पोलिस दलाकडून ३० विशेष कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण विसर्जन मिरवणुकीवर पोलिस नियंत्रण कक्षातून वॉच राहणार आहे. दरम्यान, पालिकेने लाखो रूपये खर्च करून लावलेले बहुतांश सीसीटीव्ही बंद पडल्याने पोलिस दलास खाजगी कॅमेऱ्यांचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.
यंदा गणेशोत्सव दहा दिवसांचा आहे. यामुळे दहा दिवस कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलिस दलाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. गणेश विसर्जन १५ सप्टेंबर रोजी आहे. यासाठी बडीसडक, मामाचौक, गांधी चमन, शनि मंदिर तसेच मोती तलाव मिळून ३० कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तलाव परिसरात वाढती गर्दी पाहता तेथे कॅमेऱ्यांची संख्या जास्त असणार असल्याचे पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी सांगितले.
खाजगी एजन्सीकडून ३० कॅमेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिस अधीक्षक कार्यालयात असणार आहे. अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यावर लक्ष ठेवून असणार आहे. विशेषत: मामा चौकात विविध मंडळांचे स्वागत तसेच सत्कार
होतो. त्यामुळे येथे गर्दी जास्त असते. यासाठी विशेष मनोऱ्याची व्यवस्था करून चौहूबाजूंचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बडी सडक, गांधी चमन व मोती तलाव परिसरावरही विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
नगर पालिकेने लाखो रूपये खर्च करून लावलेले सीसीटीव्ही देखभालअभावी बंद आहेत. यामुळे गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवात कॅमेऱ्यांची गरज असतानाही पालिकेकडून या कॅमेऱ्यांची दुरूस्ती करण्यात आलेली नाही.
४कॅमेऱ्यांच्या दुरूस्तीसाठी पालिकेकडे निधी नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. पालिकेचे कॅमेरे कुचकामी ठरत असल्याने शहराची सुरक्षाही धोक्यात आली आहे. सदरील कॅमेरे तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.