वर्धेत ४० ठिकाणी ‘ग्रीन झोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:06 PM2018-01-27T22:06:12+5:302018-01-27T22:06:49+5:30

स्वच्छ, सुंदर व हरित वर्धेचा पालिकेने विडाच उचलल्याचे सध्या दिसत आहे. यात आता शहरातील ४० ठिकाणी ‘ग्रीन झोन’ निर्माण करण्याचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

40 Places of 'Green Zone' in Wardha | वर्धेत ४० ठिकाणी ‘ग्रीन झोन’

वर्धेत ४० ठिकाणी ‘ग्रीन झोन’

Next
ठळक मुद्दे५ कोटींचा खर्च अपेक्षित : नगर परिषदेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

महेश सायखेडे।
आॅनलाईन लोकमत
वर्धा : स्वच्छ, सुंदर व हरित वर्धेचा पालिकेने विडाच उचलल्याचे सध्या दिसत आहे. यात आता शहरातील ४० ठिकाणी ‘ग्रीन झोन’ निर्माण करण्याचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या कामासाठी सुमारे ५ कोटींचा खर्च अपेक्षीत असून हे काम झटपट पूर्णत्वास कसे जाईल यासाठी सध्या वर्धा पालिकेकडून हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.
शहरातील बऱ्याच ठिकाणी शासनाचा निधी देत बालोद्यानाची निर्मिती करण्यात आली. यातील काही बालोद्यान सुस्थितीत आहेत तर काहींवर अवकळा आली आहे. यामुळे शहरातील सर्व मोकळ्या जागा हरितमय व्हाव्यात तसेच बच्चे कंपनीला खेळण्याची घराच्या नजीक सुविधा व्हावी या दृष्टीने शहरातील ४० जागांची निवड करण्यात आली आहे. प्रारंभी या ४० मोकळ्या जागांपैकी दोन ठिकाणी संरक्षण भिंत व नऊ ठिकाणी पेव्हमेंटचे काम करण्यात येणार आहे. तर एका ठिकाणी क्रीडा ट्रॅक विकसीत करण्यात येणार आहे. तर उर्वरित ठिकाणी संरक्षण भिंत व पेव्हेमेंटचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी वैशिष्ट पूर्ण योजनेच्या माध्यमातून चार कोटी तर न.प.चा एक कोटी असा एकूण पाच कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सदर चाळीसही जागा हरितमय करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० लाखांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
क्रीडांगण व उद्यानाची निर्मिती होणारे ठिकाण
प्रभाग १ मधील तुकडोजी प्राथमिक शाळेच्या समोरील मानस मंदिर येथील खुली जागा, चिकटे यांच्या घरासमोरील खुली जागा, शितल मंगल कार्यालय मागील दुरुतकर यांच्या घरासमोरील खुली जागा, मानस मंदिर भागातील लाभे यांच्या घरासमोरील खुली जागा, पोस्ट कॉलनी येथील सोनकुसरे यांच्या घरासमोरील खुली जागा, प्रभाग २ मधील साईबाबा मंदिराची खुली जागा, सानेगुरूजीनगर येथील वैष्णवी मंदिर समोरील खुली जागा, प्रभाग ३ जावंधीया ले-आऊट मधील खुली जागा, प्रभाग ४ यशवंत कॉलनी येथील खुली जागा, गांधीनगर येथील श्रीराम मंदिर नजीकची खुली जागा, इसाजी ले-आऊट भागातील विकास विद्यालय समोरील खुली जागा, प्रभाग ५ लक्ष्मीनगर तिवारी ले-आऊट भागातील खुली जागा, बमनोटे ले-आऊट भागातील खुली जागा, नागपूर-वर्धा मार्गावरील नखाते अभिमान्यासाची खुली जागा, स्रेहधाम येथील खुली जागा, प्रभाग ६ लहानुजीनगर येथील सराफ यांच्या घरासमोरील अभिन्यासाची खुली जागा, टावरी यांच्या घरासमोरील खुली जागा, प्रभाग ९ पी. अ‍ॅन्ड टी कॉलनी येथील खुली जागा, साबळे प्लॉट सप्तश्रुंगी मंदिर येथील खुली जागा, गोरस भंडार ले-आऊट येथील जुना आर.टी.ओ. कावळे यांच्या गॅरेज समोरील खुली जागा, गोरस भंडार कॉलनी येथील खुली जागा, साईनगर येथील हनुमान मंदिर जवळील वानखेडे यांच्या घरासमोरील मोकळी जागा, जुनी स्टेट बँक कॉलनी येथील डब्बु शर्मा यांच्या घरासमोरील खुली जागा, प्रभाग १० शारदानगर येथील खुली जागा, कोल्हे ले-आऊट येथील खुली जागा, प्रभाग ११ येथील उत्कर्ष उद्यान, सर्व सेवा संघ ले-आऊट येथील मोकळी जागा, रामनगर भागातील सर्कस मैदान परिसरातील मोकळी जागा, प्रभाग १२ सानेवाडी येथील मेहेरबाबा बाल उद्यान, गोटेवाडी येथील खुली जागा, प्रभाग १४ पोद्दार बगीचा येथील हनुमान मंदिर जवळील खुली जागा, प्रभाग १५ गौरक्षण वॉर्ड पॅथर चौक भागातील खुली जागा, तिवारी ले-आऊट भागातील खुली जागा, बंडवार ले-आऊट भागातील खुली जागा, प्रभाग १६ सप्तश्रृंगी मंदिर नजीकची मोकळी जागा, साहू ले-आऊट येथील खुली जागा, सबाने ले-आऊट येथील तक्षशीला बुद्ध विहार शेजारची मोकळी जागा, प्रभाग १७ गायकवाड व जयस्वाल यांच्या घरासमोरील खुली जागा, शिवनगर येथील मोकळी जागा व जाकीर हूसैन कॉलनी भागातील मोकळ्या जागेवर क्रीडांगण व उद्यान तयार करण्यात येणार आहे.
४० कामांसाठी १३४ निविदा
शहरातील ४० मोकळ्या जागा उद्यान व क्रीडांगण म्हणून विकसीत करण्याचे काम वर्धा न.प. प्रशासनाने हाती घेतले आहे. हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्नही सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी सदर कामांसाठी विविध कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. सध्या सीलबंद निविदा उघडल्या नसल्या तरी ४० कामांसाठी एकूण १३४ निविदा न.प.ला प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते.
डॉ. आंबेडकर उद्यानाचा होणार कायापालट
येथील डॉ. आंबेडकर उद्यानाचा विषय गत काही वर्षांपासून प्रलंबित आहे. हे प्रकरण न्यायालयापर्यंतही पोहोचले होते. अखेर सदर प्रकरण तडजोडी अंती निकाली काढण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर या उद्यानाच्या ग्रिनरीसाठी ३ कोटींचा निधी न.प. प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यात १ कोटीचा निधी अधिक टाकून या उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे.

Web Title: 40 Places of 'Green Zone' in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.