सीमाबंदीमुळे वर्धा जिल्ह्यात खासगी कंपन्यांतील ४ हजार कर्मचारी लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:12 PM2020-06-03T12:12:47+5:302020-06-03T12:15:07+5:30
आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने शिथिलता दिल्याने विविध कंपन्या व उद्योग सुरू झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रुजू होण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थानाकडून करण्यात आल्या. मात्र, सीमाबंदी असल्याने लगतच्या जिल्ह्यांमध्ये काम करणारे खासगी कंपन्यांचे ४ हजार कर्मचारी वर्ध्यातच लॉकडाऊन झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड-१९ च्या संसर्गामुळे राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व कंपन्या व उद्योग बंद ठेवण्यात आले. आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने शिथिलता दिल्याने विविध कंपन्या व उद्योग सुरू झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रुजू होण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थानाकडून करण्यात आल्या. मात्र, सीमाबंदी असल्याने लगतच्या जिल्ह्यांमध्ये काम करणारे खासगी कंपन्यांचे ४ हजार कर्मचारी वर्ध्यातच लॉकडाऊन झाले आहेत. ते कर्तव्यावर रुजू झाले नाही तर त्यांची नोकरी जाण्याची वेळ आली असून त्यांनी प्रवास परवानगीकरिता जिल्हा प्रशासनाला साकडे घातले आहे.
वर्ध्यातून दररोज नागपूर, अमरावती व चंद्रपूर या मार्गावर जवळपास ४ हजार नोकरदार प्रवास करतात. त्यापैकी ८० टक्के कर्मचारी हे खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रकोप वाढताच सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांच्या प्रवासाला ब्रेक लागला. ३१ मेपर्यंत सर्व खासगी कंपन्या, उद्योग बंद करण्याच्या करण्यात आले आणि घरूनच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नुकताच केंद्र सरकारने चौथ्या लॉकडाऊनमध्ये सूट दिल्याने कंपन्याही सुरू करण्यात आल्या आहे. कंपनी व्यवस्थापनाने सर्व कर्मचाºयांना नोटीस बजावून कामावर रुजू होण्यास कळविले आहे. मात्र, वर्ध्यातून नागपूर, अमरावती व चंद्रपूर या जिल्ह्यात जाण्या-येण्याकरिता परवानगी मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. कंपन्यांचे या लॉकडाऊनच्या काळात नुकसान झाल्याने कर्मचाºयांना २५ ते ३० टक्के कपात करून वेतन दिले जात आहे. अशातच आता कर्मचारी कामावर रुजू होऊ शकले नाही तर त्यांना कामावरून कमी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कामाच्या ठिकाणी ये-जा करण्याकरिता परवानगी देण्यात यावी, अशी मागणी वैदर्भीय रेल्वे एमएसटी प्रवासी संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
नोकरी गेल्यास परिवार उघड्यावर
च्अमरावती, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रवास करण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. पण, अद्याप परवानगी मिळाली नसल्याने नोकरी जाण्याची दाट शक्यता आहे. नोकरी गेल्यास कुटुंबीय उघड्यावर येण्याची भीती कर्मचाऱ्यांच्या मनात घर करीत असल्याने याचा परिणाम अनेकांच्या प्रकृतीवरही होत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
प्रशासनाकडून जाण्यास परवानगी मिळाल्यास १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याने, ही अट आणखीच अडचणीची ठरत आहे. आधीच नुकसानीचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेरोजगार होण्यापासून रोखण्यासाठी तत्काळ तोडगा काढण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
वर्ध्यातून दररोज अमरावती, नागपूर व चंद्रपूर या ठिकाणी अपडाऊन करणाऱ्यांची संख्या ४ हजारांच्या घरात आहे. त्यापैकी बहुतांश कर्मचारी हे खासगी क्षेत्रात काम करणारे आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच वेतन कपातीचा सामना करावा लागला. आता कंपन्यांनी रुजू होण्यास सांगितले आहे. मात्र सीमाबंदीमुळे ये-जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. सोबतच १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागणार असल्याने अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यावर तत्काळ तोडगा काढावा.
एस.दुरतकर, कर्मचारी, खासगी क्षेत्र