साहित्य खरेदीसाठी कामगारांना ४.१३ कोटी वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:12 PM2018-01-02T23:12:32+5:302018-01-02T23:12:42+5:30

बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनेंतर्गत ८ हजार २७१ कामगारांना साहित्य खरेदीसाठी ४ कोटी १३ लाख ६२ हजार २०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. कामगार अधिकारी कार्यालयातर्फे नोव्हेंबर अखेरपर्यंत नोंदणीकृत कामगारांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे.

4.13 crore to the workers for the purchase of literature | साहित्य खरेदीसाठी कामगारांना ४.१३ कोटी वितरित

साहित्य खरेदीसाठी कामगारांना ४.१३ कोटी वितरित

Next
ठळक मुद्दे२० हजार कामगारांची नोंदणी : आठ हजार लाभार्थ्यांना दिले अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनेंतर्गत ८ हजार २७१ कामगारांना साहित्य खरेदीसाठी ४ कोटी १३ लाख ६२ हजार २०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. कामगार अधिकारी कार्यालयातर्फे नोव्हेंबर अखेरपर्यंत नोंदणीकृत कामगारांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. कामगारांकरिता असलेल्या या योजनांमुळे त्यांच्यातही उत्साह निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र शासनाने असंघटीत बांधकाम व अन्य कामगारांच्या कल्याणकारी मंडळाची २०११ मध्ये स्थापना केली आहे. त्यानुसार विविध कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांना दिला जात आहे. वर्धा येथील कामगारी अधिकारी कार्यालयात कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. सन २०११ ते नोव्हेंबर २०१७ अखरेपर्यंत या कार्यालयात २० हजार ५८३ महिला-पुरूष कामगारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. यात बहुतांश कामगार बांधकाम क्षेत्रातील आहेत. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी ५ हजारांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यांच्याकडून आवश्यक त्या दस्तावेजांची पूर्तता करून त्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जात आहे. यानुसार नोव्हेंबर अखेरपर्यंत ८ हजार २७१ कामगारांना साहित्य खरेदीसाठी ४ कोटी १३ लाख ६२ हजार २०० रुपयांचे वाटप करण्यात आले.
बांधकाम तथा अन्य कामगारांकरिता कामगार अधिकारी कार्यालयामार्फत तब्बल १८ योजना राबविल्या जात आहेत. ज्या-ज्या योजनेत रक्कम प्राप्त झाली, त्या योजनांतील निधी वितरित करण्यात आला आहे. २०११ पासून या योजना राबविल्या जात असून अनुदान दिले जात आहे.
नोंदणीपासून वंचित असलेल्या तथा कागदपत्रांमध्ये काही त्रूटी असलेल्या कामगारांना कार्यालयात बोलवून नोंदणी करून घेतली जात आहे. सर्व कामगारांना लाभ मिळावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. बांधकाम कामगारांनीही योजनांचे लाभ घेण्यासाठी त्वरित नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कामगार अधिकारी धुर्वे तथा कर्मचाºयांनी केली आहे.
विविध योजनांतून असा दिला जातो लाभ
विविध योजनांमध्ये कामगारांना लाभ दिला जातो. यात कामगारांच्या पत्नीस नैसर्गिक प्रसूतिसाठी १५ हजार रुपये, शस्त्रक्रियेसाठी २० हजार रुपये, कामगारांच्या शिक्षणाकरिता इयत्ता १ ते ७ पर्यंत २ हजार ५०० रुपये व ८ ते १० वर्गापर्यंत ५ हजारांची आर्थिक मदत दिली जाते. दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांपर्यंत १० हजार रुपये, कामगारांच्या विवाहाकरिता ३० हजार रुपये, गंभीर आजार (कॅन्सर, हृदयविकार) एक लाख रुपये, अपघाती मृत्यूसाठी पाच लाख रुपये, पदवी व पदविकेच्या शिक्षणासाठी २० हजार रुपये, पाल्यांच्या मेडिकल व अभियांत्रिकीसाठी ६० हजार ते १ लाख रुपये आदी अनुदानांचा समावेश आहे.

Web Title: 4.13 crore to the workers for the purchase of literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.