१३,४५६ वाहन चालकांना ४१.३१ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:14 PM2018-07-15T22:14:12+5:302018-07-15T22:15:12+5:30

सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्या १३ हजार ४५६ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ४१.३१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

41.31 lakh penalty for 13,456 drivers | १३,४५६ वाहन चालकांना ४१.३१ लाखांचा दंड

१३,४५६ वाहन चालकांना ४१.३१ लाखांचा दंड

Next
ठळक मुद्देहेल्मेट न वापरणाऱ्या ९४३ जणांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्या १३ हजार ४५६ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ४१.३१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदर कारवाई वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी केली असून त्यांच्याकडून सध्या हेल्मेटसक्तीकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत.
जून महिन्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करताना आढळून आल्याने १८ वाहनचालकांवर कलम ६६(२), १९२ अन्वये कारवाई करून त्यांच्याकडून २ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर विना नंबर प्लेट वाहन आढळून आल्याने २३ वाहनचालकांकडून ४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ७१२ वाहनचालकांनी त्यांची वाहने नो-पार्किंग परिसरात उभी केल्याने त्यांना १ लाख ५४ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावून त्याची वसुली करण्यात आली आहे.
ट्रिपल सिट प्रवास करताना आढळून आल्याने ६० वाहनचालकांकडून १ लाख ५५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक नियमांना पाठ दाखवित राँग साईडने वाहन नेणाऱ्या २१ जणांकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दुचाकी प्रवासादरम्यान हेल्मेटचा वापर न करताना आढळल्याने ९४३ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना बगल देणाऱ्या १३ हजार ४५६ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४१ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
२५ वाहनचालकांना मोबाईवर बोलणे भोवले
गत सहा महिन्यांच्या कालावधीत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी वाहनचालविताना मोबाईलवर बोलणाºयांवर ठिकठिकाणी कारवाई करून त्यांच्याकडून ३५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहनचालविताना मोबाईलवर बोलणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणाराच प्रकार असला तरी अनेक वाहनचालक याकडे पाठ दाखविण्यातच धन्यता मानत असल्याचे दिसून येते.
वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ७७ जणांना दंड
मागील सहा महिन्यात वाहतूक पोलिसांनी ७७ जणांवर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे कारण पुढे करीत त्यांच्याकडून १३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Web Title: 41.31 lakh penalty for 13,456 drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.