४१६ पोलिसांसह एसआरपीचे जवान तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 08:54 PM2019-05-22T20:54:28+5:302019-05-22T20:57:56+5:30
गुरूवारी, २३ मे रोजी एमआयडीसी भागातील भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात सकाळी ८ वाजतापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तब्बल ४१६ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच एसआरपीच्या एका प्लाटूनचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
वर्धा : गुरूवारी, २३ मे रोजी एमआयडीसी भागातील भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात सकाळी ८ वाजतापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तब्बल ४१६ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच एसआरपीच्या एका प्लाटूनचे जवान तैनात करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे, तर शहरातील बारीक-सारीक घडामोडींवर पोलीस नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.
मतमोजणीदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे ३७ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर ३४० पुरुष आणि ३९ महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तणावासारखी परिस्थिती ओढावल्यास त्या परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी काही बंदुकधारी जवानही खडा पहारा देणार आहेत. त्यामुळे एमआयडीसी भागातील भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. याच परिसरात इंदिरा गांधी उड्डाणपूल असून एक मार्ग बरबडी, तर दुसरा सेवाग्राम रुग्णालयाकडे जातो. त्यामुळे या मार्गावर कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाकडून निवडणूक बंदोबस्तादरम्यान घेण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीकडे गोदाम परिसरात जाण्याची पास, शिवाय ओळखपत्र आहे, अशांनाच मुख्यद्वारावरून प्रवेश मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
ओळखपत्र असेल तरच ‘एन्ट्री’
एमआयडीसी भागातील भारतीय खाद्य निगमचा गोदाम परिसर बºयापैकी मोठा आहे. तेथे मतमोजणीसाठी विविध कक्षही तयार करण्यात आले आहे; पण ज्या व्यक्तीकडे आत जाण्यासाठीची पास अथवा ओळखपत्र आहे अशांनाच प्रवेश मिळेल.