४२ ‘ओपन स्पेस’ होणार सुशोभित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:48 PM2018-06-11T22:48:42+5:302018-06-11T22:48:52+5:30
शहरात मोठ्या प्रमाणात ओपन स्पेस आहे. यातील काहींचा विकास झाला तर काही जैसे थे आहेत. यामुळे या जागांचा विकास करण्यासाठी शासनाकडून ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून ४२ ओपन स्पेस सुशोभित होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात मोठ्या प्रमाणात ओपन स्पेस आहे. यातील काहींचा विकास झाला तर काही जैसे थे आहेत. यामुळे या जागांचा विकास करण्यासाठी शासनाकडून ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून ४२ ओपन स्पेस सुशोभित होणार आहे.
राज्य शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत आ.डॉ. पंकज भोयर यांनी ४ कोटी रुपये मंजूर करून घेतलेत. यात नगराध्यक्ष अतुल तराळे यांनीही पाठपुरावा केला. यातून शहरातील ४२ खुल्या जागांवर विकास कामे मंजूर करण्यात आलीत. प्रभाग क्रमांक ९ मध्ये १ कोटी १० लाख रुपयांची कामे होणार आहेत. या कामांचा शुभारंभही शनिवारी करण्यात आला. प्रभाग क्र. ९ मधील साईनगर येथील खुली जागा, पी अॅण्ड टी कॉलनी येथील जुनी जागा, जुने आरटीओ कार्यालय, गोरस भंडार, भारतीय स्टेट बँक, साबळे प्लॉट तसेच सप्तश्रृंगी येथील खुल्या जागेतील संरक्षक भिंत व पॅव्हेलियनचे बांधकाम आदी कामांचा समावेश आहे. खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, डॉ. शिरीष गोडे, जयंत कावळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, बांधकाम सभापती नौशाद शेख, नगरसेवक गटनेते प्रदीप ठाकरे, प्रभाग क्र. ९ च्या नगरसेविका श्रेया देशमुख आदींच्या उपस्थितीत कामांना प्रारंभही करण्यात आला. यावेळी खा. तडस व आ.डॉ. भोयर यांनी शहराच्या चारही बाजूने सिमेंट रस्ते, नाल्यांसह अंतर्गत परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.