खैरी धरणात ४२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:28 PM2018-10-27T22:28:03+5:302018-10-27T22:28:54+5:30

तालुक्यात खैरी धरणाची जल साठवणूक क्षमता १६ दशलक्ष घनमीटर आहे. मागील वर्षी हे धरण १०० टक्के भरून दोनदा ओव्हरफ्लो झाले होते. पण यावर्षी एकदाही ओव्हरफ्लो झाले नाही. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी या जलशयात फक्त ४२ टक्के जलसाठा आहे.

42 percent water stock in Khairi dam | खैरी धरणात ४२ टक्के जलसाठा

खैरी धरणात ४२ टक्के जलसाठा

googlenewsNext
ठळक मुद्देअनधिकृत मोटारपंप बंद करणार : ३१ आॅक्टोबरपासून मोहीम राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : तालुक्यात खैरी धरणाची जल साठवणूक क्षमता १६ दशलक्ष घनमीटर आहे. मागील वर्षी हे धरण १०० टक्के भरून दोनदा ओव्हरफ्लो झाले होते. पण यावर्षी एकदाही ओव्हरफ्लो झाले नाही. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी या जलशयात फक्त ४२ टक्के जलसाठा आहे. यापैकी ३० टक्के पाणी जलयोजनेसाठी राखून ठेवला जातो. तर १२ टक्के पाणी गुराच्या पिण्यासाठी सुरक्षित ठेवले जाते. त्यामुळे या धरणाच्या पाण्याचा होणारा उपसा तत्काळ थांबवावा अशी मागणी कारंजा नगर पंचायतने केली आहे.
खैरी धरणात आजच्या घडीला रब्बी पिकाच्या सिंचनाकरिता पाणी शिल्लक नसतानाही, अनधिकृतपणे ५० हून अधिक मोटरपंप द्वारे पाण्याचा उपसा खुलेआम सुरू आहे. पाण्याचा उपसा मोटरपंपाद्वारे असाच सुरू राहिल्यास डिसेंबरमध्ये धरण पूर्णपणे खाली होवून पिण्याचे पाणी मिळणार नाही आणि गुरांच्या पिण्याचा प्रश्न निर्माण होईल अशी अवस्था निर्माण झाली आहे. ३ किंवा ५ अश्वशक्तीच्या मोटरपंपद्वारे सिंचनासाठी होत असलेला पाण्याचा उपसा त्वरित थांबवावा, अशी लेखी तक्रार कारंजा नगरपंचायत अध्यक्षा कल्पना मस्की व उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर यांनी केली आहे.
या खैरी धरणावर नारा व २२ गावाची पाणी पुरवठा योजना कारंजा शहराची पाणी पुरवठा योजना आणि लोहारी सावंगी येथील जलपुरवठा योजना कार्यान्वित आहे. या तिन्ही मोठ्या जलपुरवठा योजना पुढील पावसाळा येईपर्यंत सुरू राहण्यासाठी धरणात ३० टक्के पाणी साठा शिल्लक असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा संबंधित २५ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण होईल.
पुढील भीषण परिस्थिती निर्माण होवू नये म्हणून कार प्रकल्पाच्या सहा. अभियंता सचिन गाढे यांनी धरणा शेजारच्या गावातील ग्रामपंचायतीना रब्बी पिकासाठी कॅनलद्वारे पाणी पुरवठा होणार नाही, असे कळविले आहे. तसेच मोटरपंपद्वारे सिंचनासाठी पाणी उपसा करणाऱ्यांना सुद्धा कडक सुचना देण्यात आल्या आहेत. पण लोक ऐकायला तयार नाहीत. शेवटी नाईलाजाने भविष्यात निर्माण होणारे पेयजलसंकट टाळण्यासाठी वर्धा जिल्हाधिकारी व नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेवून ३१ आॅक्टोबर २०१८ पासून अनधिकृत मोटरपंप बंद करून जप्त करण्याची विशेष मोहीम पोलिसांच्या सहकार्याने राबविली जाणार आहे.

न जुमानणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करणार
मागील वर्षीपर्यंत धरणात भरपूर पाणी असल्याने ३० शेतकऱ्यांना मोटरपंपाद्वारे सिंचनासाठी परवानगी दिलेली होती. यावर्षी धरणात ४२ टक्के पाणी असल्यामुळे एकाही शेतकºयाला विद्युत मोटरने पाणी उपसा करण्याची परवानगी दिलेली नाही. तरी काही शेतकरी जबरदस्तीने सिंचनासाठी मोटरपंपद्वारे पाणी उपसा करीत आहे. सुरू असलेले सर्व विद्युत मोटरपंप ३१ आॅक्टोबरपासून विशेष मोहीम राबवून बंद करू न जुमानणाºया शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करू असे सांगितले.

कारंजा नगर पंचायतने सुद्धा पाण्याचा गैरवापर व उधळपट्टी थांबविण्यासाठी टिल्लूपंप वापरू नका, नळांना तोट्या लावा, वाहने दररोज धुवू नका, नवीन घर बांधणीसाठी पिण्याचे पाणी वापरू नका अशा सूचना केल्या आहेत
- पल्लवी राऊत, नगराधिकारी, कारंजा (घा.)

Web Title: 42 percent water stock in Khairi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.