४२ स्कूल बसला आरटीओचे ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 10:09 PM2018-02-22T22:09:05+5:302018-02-22T22:09:39+5:30

स्कूल बसचे होणारे अपघात टाळण्याकरिता अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यात स्पीड गर्व्हनर, जीपीएस तंत्रज्ञानासह अन्य बाबींची सुधारणा करण्यात आली. असे असले तरी अवैध विद्यार्थी वाहतूक थांबत नसल्याचे दिसते.

 42 school buses 'break' of RTO | ४२ स्कूल बसला आरटीओचे ‘ब्रेक’

४२ स्कूल बसला आरटीओचे ‘ब्रेक’

Next
ठळक मुद्दे२.८० लाखांचा दंड वसूल : ४८० पैकी २२६ वाहनांची केली तपासणी

प्रशांत हेलोंडे।
ऑनलाईन लोकमत
वर्धा : स्कूल बसचे होणारे अपघात टाळण्याकरिता अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यात स्पीड गर्व्हनर, जीपीएस तंत्रज्ञानासह अन्य बाबींची सुधारणा करण्यात आली. असे असले तरी अवैध विद्यार्थी वाहतूक थांबत नसल्याचे दिसते. याबाबत आरटीओने दहा महिन्यांत १६४ स्कूल बस आणि ६२ विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी अवैध वाहने तपासली. यातील ४२ वाहनांचे ब्रेक आरटीओकडून आवरण्यात आले आहेत.
पाल्यांना शाळेत सोडणे आणि शाळेतून परत घरी आणणे, हे काम शहरांमध्ये पालकांसाठी जिकरीचे झाले आहे. स्कूल बस, आॅटो चालकाच्या विश्वासावर पाल्यांना शाळेत पाठवावे लागते. मागील काही वर्षांत बहुतांश शाळांनी स्वत:च्या स्कूल बस सुरू केल्या आहेत. असे असले तरी ज्यांना अधिक शुल्क अदा करणे शक्य होत नाही ते पालक आॅटोद्वारे आपल्या पाल्यांना शाळेत पाठवितात. मुंबई, नागपूर, वर्धेसह अनेक ठिकाणी स्कूल बस तथा विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांना अपघात झाल्याच्या नोंदी आहेत. या घटना लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाकडून काही नियम घालून देण्यात आलेत. शिवाय वाहनांमध्येही सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानुसार स्कूल बसमध्ये स्पीड गव्हर्नर बसविणे, जीपीएस तंत्रज्ञानाने वाहन सज्ज करणे, आसन व्यवस्था सुरळीत करणे, सुरक्षेच्या दृष्टीने खिडक्या, दारांना लोखंडी बार लावणे आदी सुधारणा सुचविल्या होत्या. शिवाय वाहन अपडेट ठेवण्याचेही निर्देश होते. या निर्देशांना बगल देणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून कारवाई केली जाते.
उपप्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या दहा महिन्यांत नोंदणी असलेल्या ४८० पैकी १६४ स्कूल बस तथा ६२ विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने तपासली. यात ५८ स्कूल बस आणि ८ अवैध वाहने दोषी आढळून आली आहे. यातील ४२ वाहने आरटीओकडून अटकावून ठेवण्यात आली आहेत. या वाहन धारकांकडून २ लाख ८० हजार ९०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलेला आहे. यातील १ लाख ५१ हजार ७०० रुपये तडजोड शुल्क तर १ लाख २९ हजार २०० रुपये विभागीय तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे शाळेत येणे-जाणे सुरक्षित व्हावे, पालकांची चिंता दूर व्हावी म्हणून स्कूल बस, आॅटो व अन्य वाहनांसाठी नियमावली तयार करण्यात आली; पण त्यालाच बगल दिली जात असेल तर कारवाईला सामोरे जावे लागेलच, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.
अपघात टाळण्यासाठी सुधारणा
स्कूल बसचे अपघात होऊन निरागस बालकांचे बळी जातात. अशा घटना राज्यात मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आरटीओकडून नियमांत सुधारणा करण्यात आली; पण त्यांनाही वाहनधारक जुमानत नसल्याने अपघात होतात. हे प्रकार रोखण्यासाठी आरटीओकडून वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. निरागस बालकांचे जीवन धोक्यात येऊ नये म्हणूनच वाहनांवर कारवाई केली जात असल्याने वाहनधारकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
शाळा, पालकांची सजगता
आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येणारी वाहने अपडेटेड आहेत की नाही, याबाबत शाळेकडून वारंवार चौकशी होणे गरजेचे आहे. शिवाय पालकांनीही आपले पाल्य ज्या वाहनांद्वारे शाळेत जातात व परत येतात, ती वाहने आरटीओच्या नियमांप्रमाणे आहेत वा नाही, हे तपासणे, त्याबाबत वारंवार चौकशी करणे तथा नियमांचे ज्ञान मिळविणे गरजेचे झाले आहे.

Web Title:  42 school buses 'break' of RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.