४२५ दिव्यांगांची आॅनलाईन नोंदणी

By admin | Published: July 11, 2017 01:03 AM2017-07-11T01:03:35+5:302017-07-11T01:03:35+5:30

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित नोंदणी मेळाव्यात ४२५ दिव्यांगाची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली.

425 Divyan's online registration | ४२५ दिव्यांगांची आॅनलाईन नोंदणी

४२५ दिव्यांगांची आॅनलाईन नोंदणी

Next

प्राथमिक आरोग्य केंद्रात मेळावा : जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
आष्टी (शहीद) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित नोंदणी मेळाव्यात ४२५ दिव्यांगाची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. या मेळाव्याची पाहणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून करण्यात आली. यावेळी दिव्यांगांना युआयडी क्रमांक देण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अनुपम हिवलेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश रंगारी, तहसीलदार सीमा गजभिये, नायब तहसीलदार रणजीत देशमुख तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य विभागाने दिव्यांगासाठी आॅफलाईन प्रमाणपत्र आॅनलाईन करून युआयडी नंबर देण्याचे काम सुरू केले आहे. तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी या मेळाव्यात एकत्र हजेरी लावली. त्यांना सोयीसुविधा देण्याचे काम शासनाकडून होत आहे. आॅनलाईन नोंदणीमुळे अपगांची फरफट कमी होणार असून मेळाव्यात त्यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिव्यांगांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांना केले. कागदपत्रात काही त्रृट्या असेक तर पुन्हा दुरुस्त करून द्या असे निर्देश दिले.
मेळाव्याला माजी आमदार दादाराव केचे यांनीही भेट देवून मार्गदर्शन केले. नगरसेवक अजय लेकुरवाळे, भाजप तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर, नरेंद्र भनेरकर यांनी अपंग बांधवांना कागदपत्रांची माहिती भरून दिली. डॉ. भागवत राऊत, डॉ. भंडारी, डॉ. आशीष निचत, डॉ. धाकडे आदींनी सहकार्य केले.

Web Title: 425 Divyan's online registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.