४५ वर्र्षांपासून पशुवैद्यकीय दवाखाना भाड्याच्या खोलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:23 PM2018-10-29T22:23:01+5:302018-10-29T22:23:28+5:30
येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- २, मागील ४५ वर्षांपासून किरायाच्या खोलीत सुरू आहे. परंतु अद्यापर्यंत या दवाखान्याला स्वत:ची इमारत मिळाली नाही. ग्रामस्थांच्या मागणीवरून ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाने येथील महसूलच्या जागेची निश्चिती करून त्यातील ६ हजार स्के. फुट जागेच्या मागणीचा प्रस्ताव सेलू तहसील कार्यालयाकडे पाठविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- २, मागील ४५ वर्षांपासून किरायाच्या खोलीत सुरू आहे. परंतु अद्यापर्यंत या दवाखान्याला स्वत:ची इमारत मिळाली नाही. ग्रामस्थांच्या मागणीवरून ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाने येथील महसूलच्या जागेची निश्चिती करून त्यातील ६ हजार स्के. फुट जागेच्या मागणीचा प्रस्ताव सेलू तहसील कार्यालयाकडे पाठविला. परंतु महसूल विभागाने सदर जागेच्या मोबदल्यात शासकीय बाजार भावानुसार ३,६२, ३२३ रू. इतकी रक्कम शासनाकडे जमा करण्यास सांगितले एवढी मोठी रक्कम कुठून आणि कशी जमा करावी, असा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम आता दिवास्वप्न राहणार असल्याची भिती गोपालकांकडून वर्तविण्यात येत आहे.
येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ ला स्वमालकीची इमारत मिळावी, अशी ग्रामस्थांची मागील अनेक वर्षापासून मागणी होती. त्याकरिता ग्रा.पं.च्यावतीने संबंधित विभागाकडे या मागणीकरिता पाठपुरावा केला होता. त्याकरिता पशु संवर्धन विभागाकडून इमारत बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविण्यात आली. परंतु ग्रा.पं.कडे पुरेशी जागा नसल्यामुळे येथील वर्धा-नागपूर महामार्गावरील विश्रामगृहाजवळील शेत सर्वे क्र १२८ व १२९ ला लागून असलेली जुनी बंद वहिवाट असलेली पांदण रस्त्याची सहा हजार स्के.फुट जागेची निश्चिती करून ती महसूल विभागाने द्यावी, असे पत्र सेलूच्या तहसील कार्यालयाकडे देण्यात आले. तेवढी जागा देण्यास सेलूच्या तहसील कार्यालयाने अनुकुलता दर्शविली. परंतु सदर जागेचे निस्तार हक्क कमी करून ते आयुक्त पशुसंवर्धन म.रा.पुणे यांच्या नावे करण्याकरिता सदर जागेच्या मोबदल्यात शाासकीय बाजारभावानुसार ३,६२,३२३ रू. जागेची मुल्य शासनाकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून दवाखान्याच्या इमारत बांधकामाकरिता निधी दिल्या जात असून जागा खरेदी करिता निधीची तरतूद नसल्याने एवढी मोठी रक्कम महसूल विभागाकडे भरण्याकरिता कुठून आणि कशी उभी करावी, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
गावातील लोकसंख्या पाच हजारापेक्षा जास्त असून येथे गोपालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सोबतच या दवाखान्याचे कार्यक्षेत्र केळझर, महाबळा, इटाळा, जंगलापूर, वडगाव (जं.) जुनगड, गायमुख या सात गावात विस्तारलेले आहे. कामाचा ताण एकट्या पशुधन पर्यवेक्षकावर आहे. सध्या स्थितीत दुग्ध सह. संस्थेच्या इमारतीच्या एका छोट्याशा खोलीतून सदर दवाखान्याचा कारभार मागील १०-१२ वर्षापासून सुरू आहे. याठिकाणी जागा अपुरी पडत असल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांसह गोपालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय कधी ना कधी तीही जागा खाली करून द्यावी लागणार आहे. त्यानंतर पुन्हा नवीन जागेकरिता भटकंती करावी लागेल.दवाखान्याच्या इमारतीकरिता जागा उपलबध करून द्यावी याकरिता आ.डॉ. पंकज भोयर यांच्याकडे गावकºयांनी सदर प्रश्न ठेवला असता त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या कार्यकक्षेत सदरचा विषय असल्याचे सांगितले आहे. व त्याकरिता आपण सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु उदासिन कारभारामुळे सदरचा प्रश्न मागे पडला आहे. या प्रश्नावर आ.डॉ. पंकज भोयर, जि.प. सदस्य विनोद लाखे यांनी पाठपुरावा करावा.