५ हजार ५०२ शेतकऱ्यांचे ४५.३८ कोटींचे कर्ज माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:07+5:30
यावर्षी पीक कर्ज वाटपात नव्याने ४ हजार १४२ शेतकरी खातेदार जुळले असून त्यांना ३८.९९ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे यावर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५ हजार ४६ पर्यंत वाढली आहे. त्यांना ५८.९४ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत बँकेतील पात्र लाभार्थ्यांची संख्या २११ असून यापैकी १७९ लाभार्थी शेतकऱ्यांना पावणेदोन कोटींची कर्जमाफी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र लाभार्थी शेतकºयांची संख्या ७ हजार ५७७ असून यापैकी ५ हजार ५०२ लाभार्थी शेतकऱ्यांना ४५.३८ कोटीची कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच योजनेत कर्जमाफी मिळालेल्या ५ हजार ५०२ शेतकऱ्यांपैकी ३ हजार ९५० शेतकऱ्यांना या हंगामाच्या ३० जुलैपर्यंत ३०.१५ कोटीचे पीककर्ज देण्यात आले आहे. तालुक्यातील १७ बँकापैकी १५ बँकांचे माध्यमातून पीक कर्जाचे वाटप केले जात आहे.
तहसील कार्यालय व महाराष्ट्र बँक शाखेत आयोजित पीककर्ज वितरण पीक विमा तसेच महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी आढावा बैठकीत पालकमंत्री सुनील केदार यांना ही माहिती देण्यात आली. यावेळी खासदार रामदास तडस, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार राजेश सरवदे, महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रिया बागडे व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावर्षी पीक कर्ज वाटपात नव्याने ४ हजार १४२ शेतकरी खातेदार जुळले असून त्यांना ३८.९९ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे यावर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५ हजार ४६ पर्यंत वाढली आहे. त्यांना ५८.९४ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत बँकेतील पात्र लाभार्थ्यांची संख्या २११ असून यापैकी १७९ लाभार्थी शेतकऱ्यांना पावणेदोन कोटींची कर्जमाफी देण्यात आली. कर्जमाफीतील या लाभार्थ्यांपैकी १०२ जणांना नव्याने ८३ लाखांचे पीककर्ज देण्यात आले. तसेच ९५ शेतकऱ्यांना ४८ लाखांचे नवीन पीक कर्जवाटप करण्यात आले. त्यामुळे यावर्षी नवीन व महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेतील एकूण १९७ शेतकऱ्यांना १ कोटी ६८ लाख ७९ हजारांचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती बँक प्रशासनाने पालकमंत्र्यांना दिली.