४,५८५ शेतकरी सोयाबीनच्या मदतीला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:33 PM2017-12-11T22:33:35+5:302017-12-11T22:35:44+5:30

साधारणत: शेती कसणारा म्हणजे शेतकरी असे बोलले जाते. व्यवहारात हा प्रकार जरी वास्तविकेशी निगडीत असला तरी शासकीय मदतीचा लाभ घेताना हा प्रकार अडचणीचा ठरत असल्याने पुन्हा एकदा समोर आले आहे.

4,585 farmers died due to the help of soybean | ४,५८५ शेतकरी सोयाबीनच्या मदतीला मुकले

४,५८५ शेतकरी सोयाबीनच्या मदतीला मुकले

Next
ठळक मुद्देएक कोटी परत जाणार : विक्री पावती अन् सातबारावरील नावातील तफावतीमुळे गोंधळ

रूपेश खैरी।
आॅनलाईन लोकमत
वर्धा : साधारणत: शेती कसणारा म्हणजे शेतकरी असे बोलले जाते. व्यवहारात हा प्रकार जरी वास्तविकेशी निगडीत असला तरी शासकीय मदतीचा लाभ घेताना हा प्रकार अडचणीचा ठरत असल्याने पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकारामुळे सोयाबीनच्या क्ंिवटलमागे मिळणाºया २०० रुपयांच्या मदतीपासून जिल्ह्यातील तब्बल ४,५८५ शेतकरी वंचित राहणार असल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यातील एवढे सोयाबीन उत्पादक शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार असले तरी या मदतीपोटी जिल्ह्यात आलेल्या एकूण रकमेपैकी १ कोटी रुपये परत जाणार आहे. यामुळे शासनाची ही योजना खºया शेतकऱ्याकरिता कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले. हा घोळ कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीकरिता वापरलेल्या खºया नावाने पावती बनली आणि सातबारा मात्र दुसऱ्याच्याच नावाने असल्याने हा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतीत नुकसान सहन करणाºया शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
गत खरीपात सोयाबीन उत्पादकांना मिळालेल्या दरामुळे मोठा फटका बसला. यामुळे अशा शेतकऱ्याना दिलासा मिळावा म्हणून शासनाने बाजारात २५ क्विंटलपर्यंत सोयाबीन विक्री करणाऱ्यांना क्ंिवटलमागे २०० रुपयांची मदत जाहीर केली. ही मदत शेतकºयांना मिळावी याकरिता बाजार समितीकडून याद्या घेत त्याची माहिती शासनाच्या पणन महामंडळाकडे पाठविले.
शेतकऱ्यांच्या याद्या तयार करताना सातबारा आणि विक्री पावती यात असलेल्या नावात तफावत असल्याचे दिसून आले. यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने पणन मंत्रालयाला या संदर्भात मार्गदर्शन मागण्यात आले. यावर त्यांनी ज्यांच्या नावे सातबारा आहे, अशाच शेतकºयांना मदत देण्याच्या सूचना केल्या. यामुळे सातबारा नसलेल्या शेतकऱ्यांच्या नावे रक्कम येवूनही ती त्यांना न मिळता शासन जमा होण्याची वेळ आली आहे. शासनाने पावतींवर नाव असलेल्या शेतकऱ्यांना जर मदत दिली असती तर झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळाली असती अशा प्रतिक्रीया शेतकऱ्यांकडून मिळत असून याचा विचार होणे गरजेचे आहे.
भाषेच्या गोंधळामुळे मदत जमा होण्यास विलंब
शेतकºयांच्या याद्या पहिले मराठीत तयार करण्यात आल्या होत्या. या याद्या इंग्रजीतून पाठविण्याच्या सूचना बँकांकडून आल्याने याद्या पुन्हा करण्यात आल्या. यामुळे रक्कम येवूनही ती शेतकºयांच्या खात्यात जमा होण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात १९,४२६ शेतकऱ्यांकरिता आले होते ६ कोटी
शासनाच्या सूचना येताच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने याद्या तयार करण्याचे काम करण्यात आले. प्रत्येक बाजार समितीतून पावत्या आणि शेतकºयांची नावे गोळा करून ती शासनाकडे पाठविली. वर्धा जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या १९ हजार ४२६ शेतकऱ्यांकरिता एकूण ६ कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली. मात्र वाटप करताना शासनाकडून सातबाराची अट टाकण्यात आल्याने याचा लाभ १४ हजार ८४१ शेतकºयांनाच मिळणार असल्याचे दिसून आले आहे. या शेतकऱ्यांकरिता ४ कोटी ५४ लाख ८ हजार ८३० रुपये बँकेत पाठविण्यात आले आहे.
तीन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम
याद्यांच्या भाषेचा घोळ आटोपल्यानंतर रक्कम खाते असलेल्या बँकेकडे पाठविण्यात आली. यात आतापर्यंत हिंगणघाट, समुद्रपूर आणि आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. इतर तालुक्यातील शेतकºयांच्या खात्यात मात्र ही रक्कम जमा झाली नाही. यामुळे उर्वरीत पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन मदतीच्या रकमेची प्रतीक्षा कामय आहे.

शासनाच्या प्रथम सुचनेनुुसार बाजार समितीत पावत्यांवरील नावाची आणि विक्रीची यादी पाठविण्यात आली. यात पावतीत असलेले नाव आणि सातबारावर असलेल्या नावात तफावत असल्याने या संदर्भात काय करावे असे मार्गदर्शन शासनाला मागविण्यात आले. यावर शासनाने सातबारा महत्त्वाचा असे म्हणत मदत देण्याच्या सुचना केल्या. यानुसार बँकांत रकमा वळत्या करण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या नावे सातबारा नव्हता अशा शेतकऱ्यांना या मदतीपासून वंचित रहावे लागले.
- ए.बी. कडू, जिल्हा उपनिबंधक, वर्धा.

Web Title: 4,585 farmers died due to the help of soybean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.